ETV Bharat / bharat

राज्यसभेतून निवृत्त झालो, राजकारणातून नाही - गुलाम नबी आझाद - गुलाम नबी आझाद लेटेस्ट न्यूज

मी राज्यसभेमधून निवृत्त झालो आहे, राजकारणातून निवृत्त झालो नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले. ते जम्मूत आयोजित शांती संमेलनाला संबोधित करत होते.

Azad
गुलाम नबी आझाद
author img

By

Published : Feb 27, 2021, 5:17 PM IST

Updated : Feb 27, 2021, 6:41 PM IST

श्रीनगर - जम्मूमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ 23 नेत्यांनी शांती संमेलन आयोजित केले. या संमेलनाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका केली. जम्मू काश्मीर किंवा लडाख असो सर्व धर्म, जाती आणि लोकांचा आदर आहे. मी सर्वांचा समान आदर करतो आणि तीच आपली शक्ती आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद

केंद्र सरकारने 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा काढून घेत, इथल्या जनतेबरोबर योग्य केले नाही. जम्मू-काश्मीरला स्वतःचा इतिहास आहे आणि या राज्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. मात्र, आज बर्‍याच वर्षांनंतर आम्ही राज्याचा भाग राहिलो नाही. आमची ओळख संपली आहे. राज्याचा दर्जा परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या आत आणि बाहेर लढा सुरूच ठेवला, तो असाच सुरु राहील, असे आझाद म्हणाले.

मी राज्यसभेमधून निवृत्त झालो आहे, राजकारणातून निवृत्त झालो नाही आणि संसदेतून मी प्रथमच निवृत्त झालो नाही, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा, कपिल सिब्बल, राज बब्बर, विवेक तन्खा उपस्थित होते.

गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेतली निवृत्ती -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतली विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा 9 फेब्रुवारीला सदस्यात्वाचा कार्यकाळ संपला. राज्यसभेतून आज चार सदस्य निवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ संपला. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादही होते. राज्यसभेत निरोपाचं भाषण करताना आझाद भावूक झाले. त्यांना भावना अनावर झाल्या. डोळ्यातून अश्रू आले. त्यांच्या निरोपाच्या भाषणाने राज्यसभेत उपस्थित सर्व सदस्य गहिवरले होते. यावेळी पंतप्रधान मोदीही भावूक झाले होते. एक उत्तम राजकीय नेता आणि माणुसकी जपणारा नेता म्हणून आझाद यांची ओळख आहे.

Last Updated : Feb 27, 2021, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.