कोलकता - शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ( WB SSC scam ) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची रात्रभर चौकशी केली. ईडीच्या ( Minister Partha Chatterjee interrogated by ed ) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 8 वाजता मंत्र्यांच्या निवासस्थानी चौकशी सुरू केली होती ती अद्याप सुरू आहे. ईडीच्या अधिकार्यांनी दक्षिण कोलकाता येथील चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जीच्या एका मालमत्तेतून 20 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. हा घोटाळा झाला तेव्हा चटर्जी राज्याचे शिक्षण मंत्री होते आणि ईडी त्यात कथितपणे सहभागी असलेल्यांची चौकशी करत आहे.
शिक्षक भरती घोटळ्याप्रकरणी चौकशी - विशेष म्हणजे, तपास यंत्रणेची आतापर्यंतची ही सर्वात अधिक काळ चाललेली चौकशी आहे. इतकेच नव्हे तर, पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस शुक्रवारी पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WBSSC) मधील भरती अनियमिततेच्या संदर्भात ईडीच्या चौकशीला सामोरे जात असताना आजारी देखील पडले होते.
शुक्रवारी सुरू झालेली चौकशी शनिवारीही सुरूच - ईडीचे अधिकारी चॅटर्जी जे सध्या राज्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत त्यांच्या दक्षिण कोलकाता येथील नक्ताला येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी 9 वाजता पोहचले होते. तेव्हा सुरू केलेली चौकशी ही शनिवारीही सुरूच असल्याचे समोर आले आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार - दुपारी 3 वाजल्यानंतर चॅटर्जी यांनी अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी मंत्र्यांच्या सहाय्यकांच्या मदतीने तत्काळ त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांना माहिती दिली. काही वेळातच तीन डॉक्टरांचे एक पथक चटर्जी यांच्या निवासस्थानी पोहचले, त्यांची तपासणी केली आणि काही औषधे दिली. चॅटर्जी यांना आराम वाटला, परंतु, डॉक्टरांनी त्यांना ईसीजी करण्याचा सल्ला दिला. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी चॅटर्जी यांच्या निवासस्थानी त्यांची कामे सुरूच ठेवली. मंत्र्यांच्या घरातील दुसऱ्या खोलीत डॉक्टरांना तयार ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांमुळे प्रचंड त्रास - चंद्रिमा : या घडामोडीवर राज्याच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली. सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय एजन्सींच्या अतिरेकामुळे पक्षाचे अनेक नेते आणि मंत्र्यांना प्रचंड मानसिक दबावाचा सामना करावा लागला आहे, असे भट्टाचार्य म्हणाल्या. यापूर्वी दिवंगत सुब्रत मुखर्जी, दिवंगत तापस पॉल आणि सुदीप बंदोपाध्याय यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना केंद्रीय यंत्रणांनी त्रास दिला होता. अशा मानसिक दडपणामुळे काहींना अकाली मृत्यूलाही सामोरे जावे लागले. आम्ही भाजप आणि केंद्र सरकारला सावध करू इच्छितो की केंद्रीय एजन्सींच्या अतिरेकीमुळे आमच्या कोणत्याही नेत्याला काही झाले तर आम्ही गप्प बसणार नाही आणि केंद्राचा विरोध करू, असा इशारा चंद्रिमा भट्टाचार्य यांनी दिला.