ETV Bharat / bharat

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवारांचीही पहिली यादी जाहीर

तृणमूल काँग्रेस, भाजपानंतर आता काँग्रेसनंही 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यात तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात लढतील.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Mar 7, 2021, 10:48 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना यंदा होणार आहे. तृणमूल काँग्रेस, भाजपनंतर आता काँग्रेसनंही 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती केली आहे.

WB Polls: Congress releases first list of candidates
काँग्रेसनंही 13 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

काँग्रेसचे 5 उमेदवार हे पहिल्या टप्प्यात तर अन्य 8 उमेदवार दुसऱ्या टप्प्यात लढतील. तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 291 उमेदवार जाहीर केले. त्यानंतर आता भाजपने आपल्या 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्या दृष्टीने भाजपाने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले सुवेंदु अधिकारी यांना मैदानात उतरवलं आहे.

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीचा सामना तृणमूल काँग्रेस, भाजप आणि डावे-काँग्रेस युती यांच्यात होणार आहे. 2016 सालच्या विधानसभा निवडणुकांवेळीही डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढले होते. दरम्यान, 2016 च्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस-डाव्यांच्या युतीला 294 जागांमधील 76 जागा तर तृणमूलला 211 जागा मिळाल्या होत्या.

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होईल.

  • पहिला टप्पा - 27 मार्च
  • दुसरा टप्पा - 1 एप्रिल
  • तिसरा टप्पा - 6 एप्रिल
  • चौथा टप्पा - मतदान 10 एप्रिलला
  • पाचवा टप्पा - मतदान 17 एप्रिल
  • सहावा टप्पा - मतदान 22 एप्रिल
  • सातवा टप्पा - मतदान 26 एप्रिलला
  • आठवा टप्पा - मतदान 29 एप्रिलला पार पडेल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.