ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा; भाजपाची मागणी - पश्चिम बंगाल निवडणूक आयोग

ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ला फक्त जनतेकडून सहानुभूती मिळवण्यासाठी असून यात डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे भाजपाने म्हटलं. या सर्व पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

भाजपाचे खासदार अर्जुन सिंह
भाजपाचे खासदार अर्जुन सिंह
author img

By

Published : Mar 15, 2021, 9:46 AM IST

कोलकाता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने रविवारी कोलकाता येथे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांची भेट घेऊन मुख्यमंत्री ममता ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली.

ममता बॅनर्जी यांनी प्रथम आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने हा हल्ला नसून एक अपघात असल्याचे म्हटले. तसेच ममता यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर लगेच सभा घेतली. हा हल्ला फक्त जनतेकडून सहानुभूती मिळवण्यासाठी असून यात डॉक्टरांचाही सहभाग असल्याचे भाजपाने म्हटलं. या सर्व पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

टीएमसीकडून आदर्श आचारसंहितेचा भंग -

टीएमसीने भाजपावर केलेला आरोप आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे पत्रात नमूद केले आहे. सत्य समोर आणले जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन जनतेला फसवून त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या, अशा घटनांचा पुनरावृत्ती होऊ नये, असे ते म्हणाले. कोलकाता येथील हजारा येथे रविवारी ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन रोड शो घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

भाजपा-टीएमसीचे एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप -

नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर ममतांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर रविवारपासून ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन आपला प्रचाराला सुरवात केली. ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. तर दीदींवरील हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.

हेही वाचा - व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची डरकाळी; म्हणाल्या... 'जखमी वाघिन जास्त घातक, खेला होबे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.