ETV Bharat / bharat

viral videos of child marriages : राजस्थानमध्ये सामुदायिक बालविवाहाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू

बालविवाहाचा व्हायरल व्हिडिओ अजमेर विभागातील ( Child Marriages on Akha Teej 2022 ) सांगितले जात आहे. एका व्हिडिओमध्ये 5 जोडप्यांना लग्नाच्या वेदीवर बसविले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुले वडिलांच्या मांडीवर बसून ( child marriage in Ajmer ) फिरत आहेत. हे व्हिडीओ पाहून प्रशासनाच्या नियमांची कशी पायमल्ली होत आहे, याची प्रचिती येते. मात्र, पोलीस व्हिडिओची पडताळणी करत आहेत..

author img

By

Published : May 6, 2022, 6:49 PM IST

viral videos of child marriages
सामुदायिक बालविवाहाचा व्हिडिओ व्हायरल

जयपूर - राजस्थानमध्ये अजूनही बालविवाहाची प्रथा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील बालविवाहाचा व्हिडिओ व्हायरल ( Viral Videos Of Child Marriages ) झाला आहे. राजस्थानच्या ग्रामीण भागात अख्खा तीजच्या दिवशी मुलांचे विवाह लावून देण्यात आले. याची पुष्टी करणाऱ्या दोन व्हिडिओ क्लिपिंग समोर ( pushkar viral video ) आल्या आहेत.

बालविवाहाचा व्हायरल व्हिडिओ अजमेर विभागातील ( Child Marriages on Akha Teej 2022 ) सांगितले जात आहे. एका व्हिडिओमध्ये 5 जोडप्यांना लग्नाच्या वेदीवर बसविले आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुले वडिलांच्या मांडीवर बसून ( child marriage in Ajmer ) फिरत आहेत. हे व्हिडीओ पाहून प्रशासनाच्या नियमांची कशी पायमल्ली होत आहे, याची प्रचिती येते. मात्र, पोलीस व्हिडिओची पडताळणी करत आहेत.

बालविवाहाचा व्हायरल व्हिडिओ

पुष्करचा व्हिडीओ - सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पुष्कर प्रदेशाचा असल्याचे सांगितले जात आहे. अमृतपुरा गावात बालविवाह आयोजित केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. देवनगर गावातून सामुहिक बालविवाहात सहभागी असलेल्या अल्पवयीन वराची मिरवणूक आल्याचेही वृत्त आहे. सामुहिक बालविवाहाबाबत अनेक गोष्टी स्पष्ट आहेत. पण वराच्या मांडीवर असलेल्या व्हिडिओवरून परिस्थिती स्पष्ट होत नाही.

पोलिसांचा तपास सुरू- पुष्कर पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल विजय सिंह यांनी या बालविवाहाची तक्रार दिली. ज्यामध्ये 3 मे रोजी आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलाचे लग्न लावल्याचे सांगितले होते. कॉन्स्टेबलच्या अहवालाच्या आधारे पुष्कर पोलीस सामूहिक विवाहाच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. दुसरा व्हिडिओ, ज्याची स्थिती स्पष्ट नाही, तो देखील अजमेर विभागाचा आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन वधू-वर इतके लहान आहेत की ते एकटे लग्नाचे विधी पार पाडू शकत नाहीत. या बालविवाहात दोन्ही पक्षांचे नातेवाईकही दिसत आहेत.

अस्वीकरण: बालविवाह बेकायदेशीर आहे. ETV Bharat बालविवाहाला समर्थन देत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.