रामपुरहाट: तृणमूल काॅंग्रेसचे (Trinamool Congress) उपप्रमुख वडू शेख यांच्या मृत्यूमुळे रामपुरहाटमधील बोगतुई गाव पेटले आहे. मंगळवारी सकाळी शेख यांच्या अनुयायांनी गावात हिंसाचार केला. अनेक घरांना आग लावली यात 12 लोक ठार झाल्याचे समोर (burns more than 5 houses, killing 12 people) आले आहे. जाळलेल्या घरातून एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर पडत असल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. गावात पोलिसांची गस्त सुरू आहे तसेचा घटनेचा चौकशीसाठी सीआयडीचे शिष्टमंडळ आणि फॉरेन्सिक टीमचे प्रतिनिधीही घटनास्थळी जात आहेत.
सध्या 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तेथे आणखी मृतदेह असण्याची भीती पोलीस आणि अग्निशमन दलाला आहे. अग्निशमन आणि बचावकार्य सुरू आहे. शेख सोमवारी हल्ल्यात ठार झाले. ते संध्याकाळी नगरपालिकेच्या कॉर्नरवर उभे होते. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या 5 हल्लेखोरांनी शेख यांच्यावर हल्ला केला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचा निषेध म्हणून शेख यांच्या अनुयायांनी आदल्या रात्रीपासूनच दंगल सुरू केली. अनेक घरांना आग लावली
हेही वाचा : Heart Wrenching Event: आईने दोन वर्षांच्या मुलीला मारुन ओव्हनमध्ये लपवले