लखनऊ - प्रेमी युगलाला पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी दोघांना मारहाण केली, नंतर विवाह करण्यास भाग पाडले. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधील कसया भागात ही घटना घडली आहे. तरुणाने गावकऱ्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तरुणाचे अमित राजभर आणि तरुणीनेच निशा गुप्ता असे नाव आहे.
अमित आणि निशाचे एकमेंकावर प्रेम होते. शुक्रवारी रात्री अमित लपत-छपत निशाला भेटण्यासाठी तीच्या घरी गेला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नीशाच्या आईने गोंधळ घातला. आरडाओरड ऐकताच गावकरी जमा झाले आणि दोघांना मारहाण केली.
मुलगा आणि मुलगी दोघेही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत जगण्याचे मान्य केले. तर दोघांचे लग्न लावून देण्यात यावे, असे गावकऱ्यांनी दोघांच्या कुटुंबीयांना समजावून सांगितले. दोन्ही कुटुंबीयांनी संमती दिल्यानंतर दोघांचे गावातील मंदिरात लग्न लावण्यात आले.
तरुणाकडून गावकऱ्यांवर कारवाईची मागणी -
घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये नेले. तरुणाने गावकऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर हे प्रकरण नोंदविण्यात आले आहे आणि नियमानुसार कारवाई केली, असे पोलिसांनी सांगितले.