नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. कोरोनावर अटकाव घालण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. मात्र, देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्रावर टीका करत आहेत. आज त्यांनी पुन्हा टि्वट करत लसीकरणाद्वारेच कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यासाठी राज्यांना लसी पुरवणे गरजेचे आहे. मात्र, एवढी साधी गोष्ट केंद्राच्या लक्षात येत नाही, असे म्हटलं.
-
वैक्सीन की ख़रीद केंद्र करे और वितरण राज्य- तभी हर गाँव तक वैक्सीन सुरक्षा पहुँच सकती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ये सीधी-सी बात केंद्र सरकार को समझ क्यों नहीं आती?
">वैक्सीन की ख़रीद केंद्र करे और वितरण राज्य- तभी हर गाँव तक वैक्सीन सुरक्षा पहुँच सकती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2021
ये सीधी-सी बात केंद्र सरकार को समझ क्यों नहीं आती?वैक्सीन की ख़रीद केंद्र करे और वितरण राज्य- तभी हर गाँव तक वैक्सीन सुरक्षा पहुँच सकती है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 24, 2021
ये सीधी-सी बात केंद्र सरकार को समझ क्यों नहीं आती?
केंद्र सरकारने कोरोना लसीची खरेदी करावी आणि लसींच वितरण राज्यांना करावं. त्यानंतरच प्रत्येक गावात लस सुरक्षितरित्या पोहचू शकेल. एवढी साधी आणि सरळ गोष्ट केंद्राच्या का लक्षात येत नाही, असा सवाल राहुल गांधी यांनी टि्वटमधून केला आहे. तसेच त्यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण ही गुरुकिल्ली आहे, परंतु भारत सरकारला याची काळजी नाही, असे म्हटलं.
लसीकरण तुटवडा -
अनेक दिवसांपासून लसीचा तुटवडा भेडसावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची लसीकरण केंद्र हे लसींचा साठा नसल्याने बंद करण्यात आले होते. राज्यांनी लस नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यांकडे लस असल्याचे केंद्राने म्हटलं आहे केंद्र सरकारकडून औषधी कंपन्यांकडून कोरोना लशींची थेट खरेदी होत असून हे कोरोना लशींचे डोस केंद्राकडून राज्यांना मोफतपणे वितरित करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना 21.80 कोटीहून अधिक लशींचे डोस वितरित केले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी -
देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2 लाख, 22 हजार, 315 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, एका दिवसातील मृत्यूंची संख्या आज पुन्हा चार हजारांच्या वर नोंदवली गेली आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना बळींची संख्या तीन लाखांवर गेली आहे. सध्या देशात 27 लाख, 20 हजार 716 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, गेल्या 24 तासांमध्ये 9 लाख, 42 हजार 722 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. यानंतर एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या 19 कोटी, 60 लाख, 51 हजार 962 वर पोहोचली आहे.