ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अनादराने बोलणे अस्वीकारार्ह - वर्षा गायकवाड - महाराष्ट्र कोरोना अपडेट

केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद बोलणे हे स्वीकारले जाणार नाही. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविरोधात अनादराने बोलणे ही आमची संस्कृती नसल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड
author img

By

Published : Aug 27, 2021, 9:25 PM IST

चेन्नई - केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद बोलणे हे कधीही स्वीकारले जाणार नसल्याचे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले. त्या तिरुनेलवेलीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

टीएमएमकेच्या नेते जनपदियानचे पुत्र वायनको पानदियान यांच्या विवाह समारंभाला शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तिरुनलवेलीमध्ये हजेरी लावली. विवाह समारंभानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन जंक्शनममध्ये आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद बोलणे हे स्वीकारले जाणार नाही. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविरोधात अनादराने बोलणे ही आमची संस्कृती नाही.

केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल अनादराने बोलणे अस्वीकारार्ह

हेही वाचा-OBC आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस

ग्रामीण भागात 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने तशी विधाने करू नयेत. महाराष्ट्राचा कायदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. (नारायण राणे प्रकरणाचा) पोलीस तपास करत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शाळा उघडल्या आहेत. कोरोना संसर्गावर अटकाव करण्यासाठी पावले उचलण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात 22 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरामध्ये शाळा उघडण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचेही शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा-नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन हा मूर्खपणाचा निर्णय - पी चिदंबरम

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यानंतर राणेंना अटक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष असल्याचे चित्र निर्माण झाले.

हेही वाचा-लखनौ : बलात्कार पीडिता आत्महदहन प्रकरणात माजी आयपीएस अमिताभ ठाकुरांना अटक

काय म्हणाले होते नारायण राणे?

'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.