वाराणसी श्रावण महिना हा हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानला गेला आहे. याच महिन्यात काशीमध्ये विश्वनाथांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र गर्दीने सर्व विक्रम मोडले Varanasi Record Of Devotees आहे. यावर्षी 1 कोटींहून अधिक भाविकांनी येथे येऊन मनोभावे दर्शन घेतले आहे. विश्वनाथ मंदिराने ही माहिती जारी केली आहे. भाविकांनी मंदिरात 5 कोटींहून 5 Crore Offering To Vishwanath Dham अधिकचा दानधर्मही केला आहे.
श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार वर्मा यांनी सांगितले की, पवित्र श्रावण महिन्यात बाबा भोलेनाथांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी याआधीचे सर्व विक्रम मोडले. जलाभिषेक करण्यासाठी दररोज अडीच ते तीन लाख भाविक मंदिरात पोहोचले. त्याच वेळी संपूर्ण महिन्यात हा आकडा एक कोटीच्या पुढे गेला आहे. तर विश्वनाथांच्या मंदिरात मनीऑर्डर, दानपेटी, ऑनलाइन, ऑफलाईन अशा विविध माध्यमातून सुमारे 5 कोटी रुपये जमा झाले आहेत.
सुनील कुमार वर्मा यांनी सांगितले की श्रावणात 40 किलो पेक्षा जास्त चांदी आणि एक कोटींपेक्षा जास्त किमतीचे सोने देखील भक्तांनी दान केले आहे. यावेळी सावनमध्ये भाविकांच्या सोयीसाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तंबू, मॅटिंग, पिण्याचे पाणी, ग्रील, इलेक्ट्रिक कुलर यासह अन्य साधनांचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था करण्यासाठी मंदिर प्रशासनाने सुमारे दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले आहेत.
हेही वाचा - Dahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास