ETV Bharat / bharat

Uttarkashi Tunnel Collapse : सिलक्यारा बोगद्यात सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरु, आता अमेरिकन ऑर्गन मशिनद्वारे प्रयत्न

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 9:44 AM IST

Uttarkashi Tunnel Collapse : उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. तसंच बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी सातत्यानं ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अमेरिकन ऑर्गन मशिनद्वारे बचावकार्य सुरु आहे.

Uttarkashi Tunnel Collapse
Uttarkashi Tunnel Collapse

सिलक्यारा बोगद्यात सहाव्या दिवशीही बचावकार्य सुरु

उत्तरकाशी (उत्तराखंड) Uttarkashi Tunnel Collapse : उत्तराखंडच्या उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांच्या सुटकेवर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वतः लक्ष ठेवून आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएम धामी यांच्याकडून घटनेचे अपडेट्स घेत आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आता अमेरिकन ऑजर मशीनच्या सहाय्यानं युद्धपातळीवर काम सुरु आहे. मशिनद्वारे आतापर्यंत पाच पाईप टाकण्यात आले आहेत. तसेच बोगद्यात अडकलेल्या लोकांपर्यंत लवकर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाच एजन्सी बचाव कार्यात : सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्यासाठी अमेरिकन ऑर्गन मशीन बसवण्यात आलीय. अशा परिस्थितीत लवकरच बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांची सुटका होईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी बचावकार्यासाठी जेसीबी मशीन, मजूर, ड्रिलिंग मशिनच्या सहाय्यानं ढिगारा हटविण्याचं काम केलं जात होतं. यात पाच एजन्सी बचाव कार्यात गुंतल्या आहेत. बचाव कार्याला गती देण्यासाठी हेवी ऑगर मशीन हा शेवटचा उपाय मानला जातोय. कारण हे यंत्र प्रत्येक प्रकारे काम करण्यास सक्षम असल्याचं सांगितलं जातं. ज्याद्वारे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची लवकरच सुटका होण्याची आशा आहे. आता बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना वाचवण्यासाठी ऑगर मशीनवर शेवटची आशा आहे. पाईप पुशिंग टेक्नॉलॉजी असलेले ऑगर मशीन बोगद्यातील ढिगाऱ्यामध्ये ड्रिलिंग करत आहे.

दिल्लीहून मागविण्यात आलं ऑगर मशीन : हे मशिन एका तासात 5 ते 6 मीटर ड्रिल करत आहे. मात्र पाईपचं वेल्डिंग व अलाइनमेंट बरोबर होण्यासाठी एक ते दोन तासांचा कालावधी लागतोय. त्यामुळं आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागू शकतात. सिलक्यारा बोगदा दुर्घटनेला आज सहा दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या मंगळवारी बोगद्यात अडकलेल्या 40 मजुरांना बाहेर काढण्यासाठी डेहराडूनहून ऑगर मशीन मागवण्यात आली होती. मात्र मशिनची क्षमता कमी झाल्यानं मंगळवारी रात्री उशिरा ते काढण्यात आले. त्यानंतर 25 टन वजनाचं नवीन अत्याधुनिक ऑगर मशीन दिल्लीहून मागवण्यात आलंय.

काय म्हणाले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : बुधवारी लष्कराच्या तीन हर्क्युलस विमानांतून ही यंत्रे चिन्यालिसौर विमानतळावर उतरवण्यात आली. गेल्या बुधवारपासून रात्री उशिरापर्यंत हे यंत्र ट्रकमधून सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पोहोचवण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा हे मशिन बसविण्याचं काम सुरु करण्यात आलं. ही मशिन गुरुवारी सकाळपर्यंत सुरू होती. यानंतर गुरुवारी सकाळी खोदकाम सुरु करण्यात आलं. त्यामुळं दुपारपर्यंत 6 मीटर लांबीचा पहिला एमएस पाइप ढिगाऱ्याच्या आत टाकण्यात आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितलं की, सिल्क्यरा बोगद्यातील भूस्खलनाच्या ढिगाऱ्यात आतापर्यंत चार पाईप टाकण्यात आलं आहेत. त्यामुळं कामगारांना बाहेर काढण्यासाठी 24 मीटरचा मार्ग तयार करण्यात आलाय. पाचव्या पाईप टाकण्याचं काम जोरात सुरु आहे.

  • अमेरिकन ऑर्गन मशिनची खासियत : बचाव पथकाशी संबंधित अधिकारी सांगतात की, आमच्याकडं सर्व प्रकारचं तज्ज्ञ उपलब्ध आहेत. यात देशभरातील आयटीबीपी आणि टनेल बिल्डिंग तज्ज्ञांचा समावेश आहे. हर्क्युलस विमानानं आलेले अमेरिकन मशीन कामगारांवर पडण्याचा धोकाही कमी करेल. अशा परिस्थितीत, मशीन कामगारांच्या बचाव कार्यास गती देईल.

हेही वाचा :

  1. Uttarkashi Tunnel Accident Rescue : सिलक्यारा बोगदा दुर्घटना प्रकरण; बचावकार्यासाठी पुश अर्थ ऑगर मशीन पोहोचल्या घटनास्थळी
  2. Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशी बोगद्यातून 40 कामगारांची सुटका करण्याकरिता प्रशासनाकडून करण्यात येणार 'हा' उपाय
  3. Landslide in Uttarakhand : उत्तराखंडात निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर 36 मजूर अडकले, बचावकार्य सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.