ETV Bharat / bharat

House Collapsed In Joshimath : भूस्खलनामुळे घराच्या मलब्याखाली दबून दोघांचा मृत्यू, चार जणांना वाचवण्यात यश - हेलांग या गावात भूस्खलनात दोन नागरिकांचा बळी

भूस्खलन झाल्यामुळे चामोली जिल्ह्यातील हेलांग येथे दोन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी चार जण जखमी झाले आहेत. हेलांग येथे घरावर मलबा कोसळून झालेल्या या अपघातात जखमी झालेले नागरिक नेपाळचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

House Collapsed In Joshimath
घटनास्थळावर सुरु असलेले बचावकार्य
author img

By

Published : Aug 16, 2023, 1:00 PM IST

देहराडून : भूस्खलनामुळे घरावर मलबा कोसळल्याने दोन जणांचा दबून मृत्यू झाला. या घटनेत चार जणांना वाचवण्यात एसडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. ही घटना जोशीमठ परिसरातील हेलांग येथे मंगळवारी रात्री उशीरा घडली आहे. उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एसडीआरएफच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चार जणांचा जीव वाचवला आहे. हुकुम बहादुर, उर्मिला देवी, सुमित्रा देवी, आणि मनीष पवार अशी एसडीआरएफने जीव वाचवलेल्या नागरिकांची नावे आहेत.

  • घरावर कोसळला मलबा : चामोली जिल्ह्यातील हेलांग या गावात भूस्खलनात दोन नागरिकांचा बळी गेला आहे. हे नागरिक घरात झोपलेले असताना ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. अलकनंदा नदी काठावर हे मजूर राहत होते. यावेळी भूस्खलन झाल्यामुळे मलबा घरावर कोसळल्याने ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  • अलकनंदा नदीच्या काठावर राहत होते मजूर : भूस्खलनातील पीडित नागरिक हे नेपाळचे राहणारे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे नागरिक अलकनंदा नदी काठावर असलेल्या खडी क्रेशरवर काम करत होते. मात्र मंगळवारी रात्री उशीरा भूस्खलन झाल्यामुळे मलबा या घरावर कोसळला. त्यामुळे या मलब्याखाली दबून दोन नागरिकांचा मृत्यू झाला.
  • मृतक आणि जखमी नेपाळचे : घरावर मलबा कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला. यात नेपाळ येथील अनमोल टीकाराम भंडारी ( वय 19 वर्ष ) आणि प्रिन्स टीकाराम भंडारी ( वय 21 वर्ष ) यांचा समावेश आहे. या दोघांसह या घटनेत हुकूम बहादूर, अमिता देवी, सुमित्रा देवी हे तिघेही जखमी झाले आहेत. हे तिघेही मूळ नेपाळचे राहणारे आहेत. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेत गंभीर झालेल्या स्थानिक नागरिक भरत सिंह नेगी आणि मनिष पवार यांना जोशीमठ येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Mathura House Wall Collapse: मंदिराजवळील इमारतीची भिंत कोसळल्याने 5 भाविकांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
  2. Shimla Landslide : शिमल्यातील भूस्खलनात आतापर्यंत आढळले 11 मृतदेह, शोधमोहीम सुरुच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.