डेहराडून- महाराष्ट्राच्या राज्यपालांमुळे उत्तराखंडमध्ये राजकारण तापले आहे. कारण, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यात येण्यासाठी उत्तराखंडने विशेष चार्टर विमान पाठविले आहे. ही उधळपट्टी असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. कोश्यारी हे खासगी दौऱ्याकरिता डेहराडूनला पोहोचले. कोश्यारी यांना मुंबईवरून आणण्यासाठी उत्तराखंड सरकारने स्पेशल चार्टर्ड प्लेन पाठविल्याचे बोलले जाते. एवढेच नव्हे तर राज्यपाल कोश्यारी यांना आणण्यासाठी उत्तराखंडचे दोन मंत्रीही मुंबईला पोहोचले होते. त्यावरून काँग्रेसने उत्तराखंडला सरकारला काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा-कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांचा जगण्याकरिता संघर्ष पाहणे ह्रदयद्रावक - सर्वोच्च न्यायालय
उत्तराखंड प्रदेश काँग्रेसच्या गढवाल मंडलचे प्रभारी माध्यम प्रमुख गरिमा दसौनी म्हणाले, की राज्य सरकारजवळ कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. वेतन करण्यासाठी सरकारने बाजारामधून कर्ज घेतले आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये राज्यावर 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. तरीही उत्तराखंड सरकार आपल्या नेत्यांची सेवा करण्यासाठी पैशांचा दुरुपयोग करत आहे. पुढे दसौनी म्हणाले, की कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जाण्याची-येण्याची व्यवसथा महाराष्ट्र सरकारने करायला हवी. मात्र, भाजप नेते जनतेवर आर्थिक बोझा लादत आहे, हे कितपत बरोबर आहे? जर मुख्यमंत्री धामी यांचे राजकीय गुरुसाठी एवढे प्रेम असेल तर भाजपकडून खर्च करावा. अथवा वैयक्तिक खर्च करावा.
हेही वाचा-तेलगांणा: कपडे फाडून महिलेला मारहाण; संपूर्ण गावाने घेतली बघ्याची भूमिका
भाजपकडून काँग्रेसवर पलटवार...
दुसरीकडे भाजपचे प्रदेश प्रवक्ता विनोद सुयाल म्हणाले, की भगसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. मात्र, त्यांना कोणत्यातरी कारणाने डेहराडूनला यावे लागले. काँग्रेसने नैतिकतेचा धडा शिकविण्यापूर्वी स्वत:कडे पाहावे. हाच काँग्रेस पक्ष आमदारांच्या खरेदी व विक्रीसाठी पाच कोटी रुपये देण्यासाठी तयार होता. मात्र, आज छोट्याशा मुद्द्यावरून गोंधळ घालत आहे.
हेही वाचा-'घटनेतील कलम 15 आणि 25 ही विकून टाकले का'; 'जय श्री राम' घोषणेवरून राहुल गांधींचा केंद्राला सवाल
यापूर्वीही उत्तराखंड सरकारच्या खर्चावर काँग्रेसने उपस्थित केले होते प्रश्न
मदन कौशिक हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सरकारी हेलीकॉप्टरने डेहराडूनवरून बागेश्वरला पोहोचले होते. बागेश्वरमध्ये पोलिसांनी कौशिक यांना मानवंदना दिली होती. तेव्हाही विरोधी पक्षांनी भाजप सरकावर टीका केली होती. उत्तराखंडचे भाजप सह प्रभारी रेखा वर्मा यांनीदेखील सरकारी हेलीकॉप्टरचा वापर केला होता. वर्मा या लोकसभा मतदारसंघ लखीमपूरला पोहोचल्या होत्या. तेव्हा काँग्रेसने सत्तेत असलेल्या भाजप सरकावर टीका केली होती. त्यानंतर कौशिक यांनी माफी मागत दोन्ही हेलिकॉप्टरच्या भाड्याचा खर्च भाजपकडून केला जाणार असल्याचे जाहीर केले होते.