ETV Bharat / bharat

उत्तराखंड महाप्रलय : आतापर्यंत ३१ मृतदेह आढळले; १७०हून अधिक बेपत्ता - उत्तराखंड महाप्रलय

तपोवन भागामध्ये एका बोगद्यात काही कामगार अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बोगद्यातून १६ लोकांना बाहेर काढण्यात आले असून, अजूनही ३५ लोक आतमध्ये अडकलेले आहेत. या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्यामुळे आत जाण्यास अडचण येत आहे. मात्र, तरीही बचाव पथकांनी आपले काम सुरू ठेवले आहे..

Uttarakhand Glacier Burst: CM Rawat reaches Joshimath to review rescue operations
उत्तराखंड महाप्रलय : आतापर्यंत ३१ मृतदेह आढळले; १७०हून अधिक बेपत्ता
author img

By

Published : Feb 9, 2021, 9:14 PM IST

देहराडून : उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीमध्ये लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफची पथके तिसऱ्या दिवशीही बचावकार्यात जुंपली आहेत. ही पथके दिवसरात्र मेहनत करुन बोगद्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहेत. तसेच, या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे.

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले, की या दुर्घटनेत एकूण २०६ लोक बेपत्ता झाले होते. यांपैकी ३१ लोकांचे मृतदेह आतापर्यंत मिळाले असून, अजूनही १७०हून अधिक लोकांचा शोध सुरू आहे.

तपोवनमधील बोगद्यात अजूनही ३५ लोक अडकलेले..

तपोवन भागामध्ये एका बोगद्यात काही कामगार अडकून पडले होते. त्यांना वाचवण्यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. या बोगद्यातून १६ लोकांना बाहेर काढण्यात आले असून, अजूनही ३५ लोक आतमध्ये अडकलेले आहेत. या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्यामुळे आत जाण्यास अडचण येत आहे. मात्र, तरीही बचाव पथकांनी आपले काम सुरू ठेवले आहे.

सध्या या बोगद्यामध्ये मोठ्या मशीनींव्यतिरिक्त एक स्कॉर्पिओ गाडी, एक मोठा लोडर, एक जेसीबी आणि आणखी दोन-तीन गाड्याही उपलब्ध आहेत. या बचावकार्यचे मॉनिटरिंग करणारे दोन अधिकारीदेखील बोगद्यामध्ये आहेत, अशी माहिती विद्या दत्त यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले, की बोगद्यामध्ये चिखलाच्या पुढेही पाणी असू शकते, त्यामुळे काळजीपूर्वक हा चिखल बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भावूक झाले होते गुलाम नबी आझाद, मागितली माफी; पाहा व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.