अयोध्या (उत्तर प्रदेश) - अयोध्येच्या धनीपूर गावात बांधल्या जात असलेल्या मशिदीचा मूळ लेआउट किंवा आराखडा तयार झाला आहे. त्याचे बांधकाम झाल्यानंतर एकावेळी सुमारे 2 हजार लोक एकत्र 'नमाज' पढू शकतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
हेही वाचा - बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाला 28 वर्ष पूर्ण! आतापर्यंतचा घटनाक्रम...
इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्टने नवीन मशिदीसाठी ब्लू प्रिंट तयार केले आहे. ही मशिदी पाडलेल्या बाबरी मशिदीच्या बदल्यात सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेल्या जागेवर बांधली जाईल. ट्रस्टने जामिया मिलिया इस्लामियाचे प्राध्यापक एस. एम. अख्तर हे आर्किटेक्चर विभागाचे अध्यक्ष आहेत.
15 हजार चौरस फूट जागांवर बांधल्या जाणाऱ्या या मशिदीच्या डिझाइननुसार त्यास आधुनिक रूप देण्यात आले आहे. सूत्रांनी सांगितले की, इमारतीचा आकार अंडाकार आहे, छप्पर हा एक घुमट असेल जो पारदर्शक असेल. मशिदीत सोलर पॅनेल्सही बसविण्यात येणार आहेत.
हेही वाचा - एकेकाळी डाकूंचा परिसर म्हणून कुप्रसिद्ध असणारं 'करौली' आता झालंय पर्यटकांचं फेवरेट!