ETV Bharat / bharat

Uttar Pradesh Assembly Election : पाच वर्षात पहिल्यांदाच अखिलेश, मुलायमसिंह आणि शिवपाल दिसले एकत्र

Uttar Pradesh Assembly Election 2022 : देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यात मतदान झाले आहे तर काही राज्यात मतदान सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात मात्र प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याची ( Uttar Pradesh Assembly Election On campaign ) दिसत आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशमधील इटावामधून एक मनोरंजक चित्र समोर आले आहे. या ठिकाणी पाच वर्षात पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव ( Akhilesh Mulayam Shivpal spotted together ) हे एकत्र दिसले ( UP Election campaign SP ) आहेत.

Uttar Pradesh Assembly Election
अखिलेश, मुलायमसिंह आणि शिवपाल यादव
author img

By

Published : Feb 18, 2022, 4:40 AM IST

इटावा (उत्तरप्रदेश) - देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. काही राज्यात मतदान झाले आहे तर काही राज्यात मतदान सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात मात्र प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याची ( Uttar Pradesh Assembly Election On campaign ) दिसत आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशमधील इटावामधून एक मनोरंजक चित्र समोर आले आहे. या ठिकाणी पाच वर्षात पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे (सपा) प्रमुख अखिलेश यादव, त्यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव ( Akhilesh Mulayam Shivpal spotted together ) हे एकत्र दिसले ( UP Election campaign SP ) आहेत.

यापूर्वी 2016 मध्ये दिसले होते एकत्र -

2017 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लखनौमध्ये "समाजवादी विकास रथ" ला झेंडा दाखवण्यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये या तिघांना सार्वजनिकरित्या एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे तिघेही कौटुंबिक वादातून वेगळे झाले होते. 2016 मध्ये कौटुंबिक वादामुळे अखिलेश यांनी काका शिवपाल यांना समाजवादी पक्षाचा बाहेरचा दरवाजा दाखवला होता. शिवपाल यांनी पुढे प्रगतीशील समाजवादी पक्ष (लोहिया) स्थापन केला. तथापि, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएसपीला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही.

भाजप सरकार संपवण्यासाठी हात मिळवणी -

शिवपाल सिंह यादव यांचा पक्ष आता अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या युतीमध्ये सहभागी आहे. अखिलेश आणि शिवपाल यांच्यातील मतभेद गेल्या वर्षी अधिकृतपणे संपुष्टात आले होते. कारण त्यांनी राज्यातील भाजप सरकार हटवण्यासाठी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर हे दोन्ही नेते कधीही एकत्र स्टेज शेअर करताना दिसले नाहीत.

पुनरागमनामुळे आमची शक्ती मजबूत होईल -

एकेकाळी सपाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या इटावामध्ये अखिलेश यादव आणि शिवपाल या दोघांनी केवळ एक मंचच शेअर केला नाही तर एकमेकांची कबुलीही दिली आहे. अखिलेश म्हणाले, "काकांच्या (शिवपाल सिंह यादव) पुनरागमनामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमची शक्ती मजबूत होईल आणि यूपी निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात आम्हाला मदत होईल."

गुरुवारी समाजवादी पक्षाच्या ‘समाजवादी विजय रथ’ ला लायन सफारी, इटावा येथून सुरुवात करण्यात आली. 'रथ' आंदोलनादरम्यान शिवपाल आणि मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या आघाडीचा प्रचार केला. मुलायम यांनी मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघात रॅलीही घेतली जिथे अखिलेश यादव हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

पुढील टप्पा २० फेब्रुवारी रोजी -

10 आणि 14 फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यातील मतदान संपले असल्याने, उर्वरित पाच टप्प्यांसाठी 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे.

२०१७ मध्ये कोणी किती जागा जिंकल्या -

उत्तर प्रदेशमधील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 403 जागांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत 312 जागा जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाने (एसपी) 47 जागा जिंकल्या होत्या, बहुजन समाजवादी पक्षाने (बीएसपी) 19 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला फक्त सात जागावर विजय मिळवता आला होता. तर उर्वरित जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या.

हेही वाचा - KCR to Meet CM Maharashtra : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मुख्यमंत्री ठाकरेंची घेणार भेट; विरोधकांची मोट बांधण्याचा नवा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.