झाशी : उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका मुलीला तीन दिवस ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी दोन तरुणांनी या मुलीला रस्त्यावरून उचलून नेले होते. तरुणांनी तिला तीन दिवस हॉटेलमध्ये ओलीस ठेवले. या दरम्यान त्यांनी आपल्या काही मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मुलीला तीन दिवस गांजा आणि बिअर प्यायला लावली : पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, तरुणांनी तिला गांजा आणि बिअरही पिण्यास भाग पाडले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींना पकडण्यासाठी पथके ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.
२ ऑगस्ट रोजी उचलून नेले होते : ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली. त्या दिवशी ही मुलगी दर्ग्यात दर्शनासाठी जात होती. त्याचवेळी स्कूटरवरून आलेल्या तरुणांनी तिला उचलून नेले. कुटुंबीयांनी सांगितले की, हे तरुण प्रथम मुलीला मध्य प्रदेशातील ओरछा येथे घेऊन गेले. वाटेत मुलीने पाणी मागितले असता त्यांनी तिला अंमली पदार्थ पिण्यास दिले. यानंतर तिला ओरछा येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. काही काळानंतर याठिकाणी या दोन तरुणांचे अन्य चार साथीदार पोहोचले.
मुलीवर ३ दिवस सतत अत्याचार : त्यानंतर हे सर्व लोक झाशी बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये थांबले आणि त्यांनी मुलीवर तीन दिवस बलात्कार केला. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अत्याचार करताना तरुणांनी मुलीला गांजा आणि बिअरही प्यायला लावली. ३ दिवस सततच्या अत्याचारामुळे मुलीची प्रकृती बिघडली. त्यानंतर ४ ऑगस्टच्या रात्री तरुणांनी तिला बसस्थानकाजवळ सोडून पळ काढला. यानंतर मुलगी ५ ऑगस्टला सकाळी कशीतरी झाशीला पोहचली. तिच्याबद्दलची माहिती कुटुंबीयांना मिळाली.
पाच तरुणांना ताब्यात घेतले : यानंतर कुटुंबीय जिथे मुलगी आहे तिथे पोहोचले. त्यावेळी ती मरणासन्न अवस्थेत दिसली. मुलीची गंभीर स्थिती पाहून कुटुंबीयांनी तिला थेट रुग्णालयात नेले. तेथे दोन दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलीला थोडी शुद्ध आल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तडक कारवाई करत पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित तरुणांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक स्थापन केले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :