नागौर - केंद्रीय मंत्री डॉ. संजीव कुमार बाल्यान म्हणाले की, सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून काँग्रेस नेते जी आगपाखड करीत आहेत ती अनावश्यक आहे. सोनिया गांधी या काही देशाच्या कायद्याच्या वर नाहीत ( Sanjeev Balyan on Sonia Gandhi ). कोणी चुकीचे काम केल्यास कारवाई केली जाईल.
नागौर दौऱ्यावर आलेले बाल्यान म्हणाले की, सोनिया गांधींच्या चौकशीवरून काँग्रेसचे लोक गदारोळ का करत आहेत? जर तुम्ही चूक केली नसेल तर तुम्हाला तुम्हाला भीती कशाची वाटत आहे. एकतर सोनिया गांधी वेगळ्या आहेत असे म्हणा, त्या कायद्याच्या वर आहेत, असे तुम्हाला म्हणायचे आहे का. राजेशाही आता राहिलेली नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत सर्व समान आहेत. कायदा आपले काम करील, चुकीचे असेल तर कारवाई केली जाईल, असे मंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.