तिरुपती (आंध्रप्रदेश) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण विभागीय परिषदेची बैठक सुरू झाली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. या बैठकीशी संबंधित 26 विषयांवर चर्चा यावेळी चर्चा होणार आहे.
या बैठकीला दक्षिण राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थित आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी उद्घाटनाचे भाषण देतील. बैठकीचे विषयाबाबत परराष्ट्र विभागाचे राज्य सचिव माहिती देतील. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह समारोपाचे भाषण देतील.
बैठकीला कोण उपस्थित -
- तामिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री - पोन्नुमुडी
- केरळचे महसूल विभागाचे मंत्री - राजन
- तेलंगाणाचे गृहमंत्री - महमूद अली
- पॉंडेचेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामी
- कर्नाटकचे मुख्यमंत्री - बसवराज बोम्मई
- पॉंडेचेरीचे प्रभारी राज्यपाल - तमिलसाई
- अंदमान-निकोबारचे नायब राज्यपाल - देवेंद्र कुमार जोशी
- लक्षद्वीपचे प्रशासक - प्रफुल्ल पटेल