ETV Bharat / bharat

Coronavirus update : आतापर्यंत कोरोना संक्रमितांची संख्या चार लाखांच्या पार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन रुग्णसंख्या केली जाहीर - कोरोना लसीकरण

आज सकाळी भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry of India) गेल्या २४ तासांतील कोरोनाची नवीन रुग्णसंख्या जाहीर केली (new number of corona patients ) आहे. दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4 कोटींच्यावर पोहोचली (Corona cases in India) आहे.

Coronavirus update
भारतात कोरोनाचे रूग्णसंख्या
author img

By

Published : Dec 23, 2022, 1:19 PM IST

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांतील कोरोनाची नवीन रुग्णसंख्या आज सकाळी भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry of India) जाहीर केली आहे. भारतात एका दिवसात कोविड 19 विषाणू संसर्गाचे 163 नवीन रूग्ण समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,76,678 वर पोहोचली आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3380 आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता भारताच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,30,690 झाली (new number of corona patients) आहे.

संसर्गामुळे मृत्यू : संसर्गामुळे मृत्यूची आकडेवारी काढताना केरळने जागतिक साथीच्या रोगामुळे प्राण गमावलेल्या रुग्णांच्या यादीत आणखी सहा नावे जोडली (Corona cases in India) आहेत. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,380 आहे. जी एकूण रूणांच्या 0.01 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 22 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 4,41,42,608 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. तर कोविड 19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के (Coronavirus update) आहे.

एकूण रूग्ण संख्या : आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 220.03 डोस देण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी संसर्गाची एकूण रूग्ण संख्या 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख व 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख तर 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 90 लाखांवर गेली (Corona cases ) होती.

कोटींचा आकडा पार : 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती. 23 जून 2021 रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली (new number of corona patients ) होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.