ETV Bharat / bharat

पेट्रोलसह डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार? निर्मला सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारकडून होणाऱ्या कामांची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या कामाचे कौतुकही केले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांवरही टीका केली आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन
author img

By

Published : Sep 24, 2021, 6:25 PM IST

चंदीगड - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी चंदीगडच्या दौऱ्यावर पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या आर्थिक कामगिरीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येण्याबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे.

निर्मला सीतारामण म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 7 सप्टेंबरचा जन्मदिवस ते 7 ऑक्टोबरपर्यंत भाजपकडून देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 वर्षांपासून सरकारमध्ये राहून देशाची सेवा करत आहेत. यापूर्वी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री तर सध्या देशाचे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत आहेत.

पेट्रोलसह डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार?

हेही वाचा- भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू

सरकारकडून परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न-

कोरोनाच्या संकटाने देशातील लघू आणि मोठ्या उद्योगांवर मोठा वाईट परिणाम झाला आहे. सरकारकडून परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. कर्जहमी देऊन कर्ज देण्याकरिता विविध मोठ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरो बॅलन्सवर बँक खाते सुरू केली होती. त्यावेळी विरोधी पक्षांनी खिल्ली उडविली होती. त्याच बँक खात्यांमध्ये सरकारकडून लाभार्थ्यांना रक्कम पाठविली जात आहे.

हेही वाचा- अबब! चुकीचा हेअरकट केल्याने करावी लागली 2 कोटींची भरपाई

मध्यवर्गीय लोकांसाठीही सरकारकडून बरेच काम

पुढे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, की सबका साथ, सबका विकास ही आमची घोषणा आहे. गरीबापर्यंत हा विकास पोहोचविल्याशिवाय शक्य होणार नाही. मध्यवर्गीय लोकांसाठीही सरकारकडून बरेच काम करण्यात येत आहे. मध्यमवर्गीयांसाठी कमी व्याजदरात गृहकर्ज देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीही अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

हेही वाचा- पुन्हा घंटा वाजणार.. राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून होणार सुरू, मात्र.. शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली

पेट्रोल डिझेल हे लवकरच जीएसटीच्या कक्षेत?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की पेट्रोल आणि डिझेलचा दर निश्चित केला जाणार आहे. पेट्रोल व डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत कधी आणायचे हे राज्यांनी निश्चित करावे. तसेच किती जीएसटी लागावा, हेदेखील राज्ये निश्चित करणार आहेत. जीडीपीच्याबाबत विरोधी पक्षांकडून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर लक्ष देऊ नये. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कामे सुरू असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.