पाटणा - बिहार राज्यातील पाटणा शहरातल्या गौरीचक पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रामधील बेलदारीचक येथे एक भीषण अपघात झाला आहे. एका अनियंत्रित झालेल्या बसने एका रिक्षास जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ४ जण ठार झाले आहेत. मृतामध्ये दो लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पाटण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे..
रास्तारोको, जाळपोळ-
एका कुटुंबातील ७ जण मंदिरात जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी समोर येणाऱ्या एका अनियंत्रित बसने या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी घटनास्थळावरच रास्तारोको आंदोलन सुरू केले.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, नागरिकांनी पाटणा -मसौढ़ी महामार्ग रोखून धरला. तसेच काही नागरिकांनी रस्त्यावर जाळपोळीचे प्रकार देखील घडले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच अपघाताचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिले.