प्रयागराज(उत्तर प्रदेश) - उमेश पाल यांना मारण्यासाठी गुड्डू मुस्लिमने दिल्लीहून शस्त्रे मागवली होती. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या एका तस्कराने पोलिसांना ही माहिती दिली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी प्रयागराजच्या सरैया स्वराज नगरमध्ये असलेल्या गुड्डू मुस्लिमच्या वडिलोपार्जित घरावर नोटीस चिकटवली आहे. तसेच त्याचे घर पाडण्याची तयारी सुरू झाली आहे.
गुड्डू मुस्मिलचे घर होणार जमीनदोस्त - दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या बेकायदेशीर शस्त्रास्त्र तस्कराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असद, गुड्डू मुस्लिम आणि असद कालिया यांच्या विरोधात शस्त्र कायद्याच्या कलम 41 अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आले आहे. यूपी एसटीएफने केलेल्या चकमकीत असद मारला गेला, तर असद कालिया हा देखील यूपी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचबरोबर गुड्डू मुस्लिमचा कोणताही मागमूस सापडलेला नाही. दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलीस देखील गुड्डू मुस्लिमच्या शोधात आहेत.
गुड्डू दिल्ली पोलिसांच्या रडारवर - रविवारी संध्याकाळी उशिरा दिल्ली पोलिसांचे पथक शिवकुटी पोलिस स्टेशन परिसरातील लालाच्या सरैया स्वराज नगरमध्ये असलेल्या गुड्डू मुस्लिमच्या वडिलोपार्जित घरात पोहोचले. त्या घरावर दिल्ली पोलिसांनी नोटीस चिकटवली आहे. तसेच लवकर हे घर जमीनदोस्त होणार असल्याची माहिती मिळत आहे.
गुड्डू मुस्लिमला दोन रुपये प्रति महिना मिळायचा - गुड्डू मुस्लिमच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणारी गुड्डू मुस्लिमची बहीण नसरीन बानो हिने मीडियाशी संवाद साधला. गुड्डू मुस्लिम पूर्वी मोहम्मद मुस्लिम म्हणून ओळखले जात होता. वयाच्या 13 व्या वर्षी अब्बाने त्याला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून मी त्याला पाहिले नाही. गुड्डू मुस्लिम लहानपणापासून खूप खोडकर होता. तो शाळेत शिकायला गेला नाही. नसरीन बानोने सांगितले की, वयाच्या 10 व्या वर्षी गुड्डूला स्कूटर बनवण्याच्या दुकानात 2 रुपये प्रतिदिन कामावर लावले होते. त्यांना व्हीसीआरवर चित्रपट पाहण्याची आवड होती. त्याने घरातील सदस्यांना विविध प्रकारची कुप्रथा करून त्रास दिला होता. त्यामुळे आबांनी त्याला घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर गुड्डू मुस्लिमने काय केले याची माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.