ब्रिटनमधील एका मूळच्या मल्याळी मेकॅनिकल अभियंत्याने ( UK Based Kerala Engineer ) लॉकडाऊनच्या काळाचा अत्यंत कल्पकतेने वापर करून चक्क स्वतःचे विमान ( Engineer Builds Plane ) तयार केले. केवळ दाखविण्यापुरते हे विमान नव्हते तर त्या विमानाने त्याने चक्क गगनभरारीही घेतली आहे. आपल्या कुटुंबासह त्याने या विमानातून युरोपचा दौराही केला.
-
UK-based Kerala engineer builds his own plane in lockdown, travels through Europe with family
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/K4krg1g0DR#UKBasedEngineer #IndigenousAircraft #KeralaEngineerBuildsPlane pic.twitter.com/4aolKEFzhl
">UK-based Kerala engineer builds his own plane in lockdown, travels through Europe with family
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2022
Read @ANI Story | https://t.co/K4krg1g0DR#UKBasedEngineer #IndigenousAircraft #KeralaEngineerBuildsPlane pic.twitter.com/4aolKEFzhlUK-based Kerala engineer builds his own plane in lockdown, travels through Europe with family
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2022
Read @ANI Story | https://t.co/K4krg1g0DR#UKBasedEngineer #IndigenousAircraft #KeralaEngineerBuildsPlane pic.twitter.com/4aolKEFzhl
केरळचा रहिवासी - अशोक थामरक्षन असे या अभियंत्याचे नाव आहे. केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. या अभियंत्याने ब्रिटिश नागरी विमान वाहतूक कंपनीकडून वैमानिकाचा परवाना मिळवला होता. अशोक यांनी सांगितले की, "लॉकडाऊनच्या काळात मला विमान बनवण्याची कल्पना सुचली. त्यासाठी मी लंडनमधील माझ्या घरात एक तात्पुरते वर्कशॉप सुरू केले. मी मे 2019 मध्ये विमानाचे काम सुरू केले आणि ते 21 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण केले. ."
पहिले उड्डाण 7 फेब्रुवारीला केले - "परवान्यासाठी, तीन महिन्यात तीन वेळा ट्रायल फ्लाइट आवश्यक होती. पहिले उड्डाण 7 फेब्रुवारी 2022 रोजी 20 मिनिटांचे लंडनमध्ये होते. त्यानंतर 6 मे रोजी आम्ही त्याच विमानातून जर्मनी, फ्रान्स आणि इटलीचा कौटुंबिक दौरा केला, असेही अशोक यांनी पुढे सांगितले. ट्रॅफिक ब्लॉकच्या समस्यामुळे अशोक यांनी स्वतः विमान बनवण्याचा विचार केला. आता विमानाच्या सहाय्याने ते एका तासात 250 किलोमीटरचा प्रवास कोणत्याही ट्रॅफिक ब्लॉकशिवाय करू शकतात.
चार देशात केला प्रवास - "मला नेहमीच माझ्या कुटुंबाला विमानातून सहलीवर घेऊन जावे असे वाटत होते. मात्र, विमान भाड्याने घेणे हा खूप महागडा पर्याय होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मी विमान बनविले. आम्ही 4 देशांत विमान प्रवास केला आणि हे विमान देशात कुठेही उड्डाण करण्यास सक्षम आहे", असे थमाराक्षन म्हणाले.
विमानाला मुलीचे नाव - हे विमान चार आसनी आहे. यातून त्यांनी विविध देशांचा प्रवासही केला. हे विमान बनविण्यासाठी त्यांना सुमारे 1,40,000 युरो खर्च आला आहे. त्यांनी त्यांच्या विमानाचे नाव "जी दिया" ठेवले आहे. G हे लंडनमधील विमानांचे प्रतीक आहे आणि 'दिया' हे त्यांच्या लहान मुलीचे नाव आहे.
माजी आमदारांचे पुत्र - त्यांची पत्नी अभिलाषा मूळची इंदूरची असून लंडनमध्ये विमा क्षेत्रात काम करते. सध्या हे कुटुंब भारतात आलेले असून ३० जुलै रोजी लंडनला परतणार आहे. बिलेरिक, एसेक्स, यूके येथे अशोक थामरक्षन आपल्या कुटुंबियांसोबत येथे राहतात. 38 वर्षीय अभियंता अशोक हे माजी आमदार प्रा. ए. व्ही. थामरक्षण आणि डॉ. सुहृथ लता यांचे पुत्र आहेत.
हेही वाचा - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळील 48 इमारती पाडण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश