नवी दिल्ली UFO Near Imphal Airport : रविवारी (२० नोव्हेंबर) दुपारी २.३० च्या सुमारास इंफाळ विमानतळावर एक अज्ञात उडणारी वस्तू दिसली होती. त्याचा येथील व्यावसायिक उड्डाणांवर परिणाम झाला होता. आता या प्रकरणी भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांद्वारे शोध घेण्यात आलाय.
राफेल विमानानी घेतला शोध : "इम्फाळ विमानतळाजवळील यूएफोची माहिती मिळाल्यानंतर लगेचच जवळच्या एअरबेसवरून राफेल लढाऊ विमानानं जाऊन शोध घेण्यात आला," असं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. "प्रगत सेन्सरनं सुसज्ज असलेल्या विमानानं UFO शोधण्यासाठी संशयित क्षेत्रावरून खालच्या स्तरावर उड्डाण केलं. परंतु तेथे काहीही सापडलं नाही. पहिलं विमान परत आल्यानंतर आणखी एक राफेल लढाऊ विमान पाठवण्यात आलं. शोध घेतला पण परिसरात UFO दिसला नाही. संबंधित एजन्सी UFO चा तपशील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण इंफाळ विमानतळावर UFO चे व्हिडिओ आहेत," असं त्यांनी सांगितलं.
हवाई संरक्षण प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली : भारतीय हवाई दलाच्या शिलाँग-मुख्यालयाच्या पूर्व कमांडनं सांगितलं की, "आयएएफनं इम्फाळ विमानतळावरील व्हिज्युअल इनपुटवर आधारित आपली हवाई संरक्षण प्रतिसाद यंत्रणा सक्रिय केली. त्यानंतर ती वस्तू दिसली नाही. भारतीय हवाई दलाची राफेल लढाऊ विमानं पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई तळावर तैनात आहेत. याशिवाय ते चीनच्या सीमेवर पूर्वेकडील सेक्टरमधील वेगवेगळ्या हवाई तळांवरून उड्डाण करत आहेत".
मेगा एअर फोर्स सराव : हवाई दलाच्या राफेल लढाऊ विमानांनी अलीकडेच चीनच्या सीमेवर पूर्वी आकाश या मेगा एअर फोर्स सरावात भाग घेतला होता. यामध्ये सैन्याच्या सर्व प्रमुख तुकड्यांनी भाग घेतला होता.
हेही वाचा :