ETV Bharat / bharat

Porbandar News : दोन महिन्यांच्या चिमुरडीला गरम सळईचे चटके देऊन उपचार, पोरबंदर येथील घटना - Porbandar News

खोकल्याच्या उपचारासाठी 2 महिन्यांच्या चिमुरडीला गरम लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. पोरबंदरमधील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आजच्या आधुनिक युगात एकीकडे लोक स्मार्टफोनचा वापर करतात, पण आजारी पडल्यावर ते डॉक्टरांचा सल्ला न घेता बाबा किंवा तांत्रिकाचा सल्ला घेतात.

Porbandar News
पोरबंदर येथील घटना
author img

By

Published : Feb 13, 2023, 7:24 PM IST

गुजरात : गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यात खोकल्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका 'स्वयंभू डॉक्टराने' लाल-गरम लोखंडी सळाईने चटके दिल्यामुळे एका दोन महिन्यांच्या चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एकीकडे विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असताना, साध्या खोकल्यासारख्या आजारावर देखील आजही नागरिक चुकीच्या गोष्टींना बळी पडत असल्याचे दिसून येते.

अशी घडली घटना : सामान्य रुग्णालयाचे डॉ. जय बदियानी यांनी माध्यमांना सांगितले की, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 9 फेब्रुवारी रोजी मुलीला रुग्णालयात आणण्यात आले होते. 'तिला आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्ट प्रणालीवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान, आम्हाला आढळले की, तिच्या फुफ्फुसांचे कार्य मंदावले आहे. यामुळे तिची गुंतागुंत वाढली आहे. पोरबंदर येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल मुलीची प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिली माहिती : पोलीस उपअधीक्षक सुरजीत मेहेदू यांनी सांगितले की, बनावट डॉक्टरला रविवारी अटक करण्यात आली आणि डॉक्टरच्या आणि मुलाच्या आईविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली. मुलीला शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. ती निरीक्षणाखाली असून; तिची प्रकृती आता स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. मेहेदू म्हणाले की, 'मुलीला एका आठवड्यापूर्वी खोकला आणि कफ झाला होता आणि तिच्या पालकांनी घरी स्थानिक उपाय करून पाहिले, पण आराम मिळाला नाही. त्यानंतर मुलीच्या आईने तिला देवराजभाई कटारा नावाच्या एका व्यक्तीकडे नेले.

गुन्हा दाखल : कटारा याने मुलीच्या छातीवर आणि पोटावर लाल-गरम लोखंडी सळईने चटके दिल्याचा आरोप आहे. तिला आराम न मिळाल्याने पालकांनी मुलीला पोरबंदर येथील भावसिंगजी जनरल हॉस्पिटलमध्ये नेले आणि ही बाब उघडकीस आली. अर्भकाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे, कटारा आणि मुलाच्या आईविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि इतर तरतुदींनुसार एफआयआर नोंदवण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अशीच एक घटना याआधी देखील घडली : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात उपचाराच्या नावाखाली शरीरावर डाग देण्याच्या प्रथेचे प्रमाण जास्त आहे. अलीकडेच शहडोल जिल्ह्यातील कथौटिया गाव एका निष्पाप मुलीला डाग दिल्यामुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा शहडोल जिल्ह्यातील समतपूर गावातून आणखी एक निष्पाप मुलीला उपचाराच्या नावाखाली डाग दिल्याची घटना समोर आली होती. आता खोकल्याच्या उपचारासाठी 2 महिन्यांच्या चिमुरडीला गरम लोखंडी सळईचे चटके दिल्या गेले आहे. पोरबंदरमधील या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आजच्या आधुनिक युगात एकीकडे लोक स्मार्टफोनचा वापर करतात, पण आजारी पडल्यावर ते डॉक्टरांचा सल्ला न घेता बाबा किंवा तांत्रिकाचा सल्ला घेतात.

हेही वाचा : Girl Burnt With Hot Rods : उपचाराच्या नावाखाली ३ महिन्यांच्या मुलीला गरम सळ्यांनी चटके, प्रकृती चिंताजनक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.