श्रीनगर (जम्मू काश्मीर)- जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात असलेल्या सोपोरे या ठिकाणी तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने चकमकीत ठार केले आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये सकाळी चकमक झाली होती.
चकमकीमुळे श्रीनगर ते बारामुल्लाची रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. दक्षता म्हणून परिसरातील इंटरनेट सेवादेखील स्थगित करण्यात आली आहे. चकमकीदरम्यान तीन दहशतवादी ठार झाले आहे. अजूनही चकमक आणि स्वच्छता सुरू असल्याचे जम्मू आणि काश्मीरच्या अधिकाऱ्याने सांगितले. सैन्यदलाने शस्त्रे आणि स्फोटके जप्त केल्याची अधिकाऱ्याने माहिती दिली.
हेही वाचा-खाद्यतेल पुन्हा महागलं; तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ
शोधमोहिमेचे एन्काउन्टरमध्ये रुपांतरण-
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की पोलीस, सैन्यदलाचे 52 आरआर आणि सीरआरपीए 177,179 आणि 92 कॉर्डोन्ड यांच्या संयुक्त पथकाने मिळालेल्या माहितीनुसार गावात शोधमोहिम सुरू केली. संशयित ठिकाणी पोहोचताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमेचे रुपांतरण एन्काउन्टरमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा-नारायण राणेंना अटक करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला - भाजप प्रवक्ते संबित पात्रा
आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरक्षा दल सज्ज
नुकतेच काश्मीरचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (आयजीपी) विजय कुमार म्हणाले, सुरक्षा दल हे अलर्ट आहे. काश्मीरमध्ये तालिबानसह सर्व आव्हानांना सुरक्षा दल हाताळू शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राहण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले. ते पुलावामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात असलेल्या सैन्यदलाच्या मुख्यालयात माध्यमांशी बोलत होते. तालिबानींचा काश्मीरला काय धोका आहे, याबाबत विजय कुमार म्हणाले, आम्ही सर्व प्रोफशनल पद्धतीने आव्हाने हाताळणार आहोत. आम्ही सर्व दक्ष आहोत. दहशतवादी, आत्मघातकी बॉम्बर्स किंवा आयईडीचे सेटअप करण्याचे नियोजन करणारे याविषयी काही माहिती असल्यास लोकांनी ती माहिती द्यावी, अशी त्यांनी विनंती केली.
हेही वाचा-तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : आज 146 नागरिकांना भारतात सुरक्षित आणलं