धौलपूर (राजस्थान) - जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पार्वती नदीत पूजेचे सामान विसर्जित करण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना मनिया ठाणे हद्दीच्या ग्राम पंचायत विनती पुराच्या खूबी का पुरा या गावात सोमवारी संध्याकाळी उशीरा घडली.
हेही वाचा - दिल्लीतील अफगाण महिलांनी सांगितली तालिबानची क्रुरता...
मिळालेल्या माहितीनुसार, खूबी का पुरा गाव येथे 14 वर्षीय छवी आणि 8 वर्षीय अनुष्का या रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या विसर्जन कार्यक्रमांतर्गत पार्वती नदीत पुजेचे सामान विसर्जित करायला गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर गावातील अन्य मुली देखील होत्या. छवी पुजेचे सामान घेऊन नदीत उतरली, या दरम्यान पाय घसरल्याने ती खोल पाण्यात बुडाली. तिला डुबत असल्याचे पाहून वाचवण्यासाठी अनुष्काने देखील पाण्यात उडी घेतली. दोन्ही मुलींना पोहता येत नव्हते. पाहता पाहता दोन्ही मुली नदीच्या खोल पाण्यात बुडून गेल्या. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या इतर तरुणी आणि महिलांनी आरडाओरड केली. काही वेळात नातेवाईक आणि ग्रामस्थ देखील किनाऱ्यावर पोहचले. स्थानिक गोताखोरांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह बाहेर काढले.
मुलींचे मृतदेह पाहून नातेवाईकांचे रडून रडून हाल झाले होते. घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी मनिया ठाण्याच्या पोलिसांना दिली. पोलिसांनी गावात पोहचून मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांना मनिया राजकीय रुग्णालयाच्या शव गृहात पाठवले. उशिरा रात्री दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यास नातेवाईकांना देण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण गावात शांतता आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांना ओळखणेही झाले कठीण; जर्मनीत सुरू केले पिझ्झा डिलिव्हरीचे काम