ETV Bharat / bharat

Goa Cm : गोवा रणसंग्राम; प्रमोद सावंत की विश्वजित राणे, कोण कोणार गोव्याचे मुख्यमंत्री? - गोवा रणसंग्राम कोण कोणार गोव्याचे मुख्यमंत्री?

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या. ( Bjp Won Goa Election 2022 ) सोबत ३ अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) २ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अस्थिर गोव्यात भाजप पहिल्यांदाच मजबूत स्थितीत आहे. पण भाजपमध्ये आता अंतर्गत प्रमोद सावंत ( Dr. Pramod Sawant ) यांचा एक गट आणि विश्वजित राणे ( Vishwajit Rane ) यांचा दुसरा गट, असे दोन गट पडल्याचे समोर आले आहे. विश्वजित यांनी नुकतीच गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरण पिल्लई यांची भेट घेतली होती. ( Vishwajit Rane met Governor P. S. Sreedharan Pillai ) तेव्हापासून त्यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Two factions in Goa BJP, who become goa cm
कोण कोणार गोव्याचे मुख्यमंत्री?
author img

By

Published : Mar 15, 2022, 3:57 PM IST

Updated : Mar 15, 2022, 7:57 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या. ( Bjp Won Goa Election 2022 ) सोबत ३ अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) २ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अस्थिर गोव्यात भाजप पहिल्यांदाच मजबूत स्थितीत आहे. पण भाजपमध्ये आता अंतर्गत प्रमोद सावंत ( Dr. Pramod Sawant ) यांचा एक गट आणि विश्वजित राणे ( Vishwajit Rane ) यांचा दुसरा गट, असे दोन गट पडल्याचे समोर आले आहे. विश्वजित यांनी नुकतीच गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरण पिल्लई यांची भेट घेतली होती. ( Vishwajit Rane met Governor P. S. Sreedharan Pillai ) तेव्हापासून त्यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपला मिळाल्या २० जागा -

गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणकून २० जागा मिळाल्या. दक्षिण गोव्यात ख्रिश्चन मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे केवळ उत्तर गोव्यातून भाजपला अपेक्षा होती. पण निवडणुकीने वेगळेच राजकीय समिकरण समोर आणले आहे. भाजपला जशा उत्तर गोव्यात १० जागा मिळाल्या, तशाच दक्षिण गोव्यातही १० जागा मिळाल्या. ख्रिश्चन बहुल भागातही भाजपला चांगले मतदान झाले आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि आम आदमी पक्ष यांच्या उमेदवारांनी भाजपचा मार्ग सुकर केला असला तरी हिंदुत्त्वावर एकहाती मते मिळविण्याचे कसब भाजपने शक्य करुन दाखवले.

मतमोजणीपूर्वी भाजपची कसरत -

मतमोजणीपूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला १५-१६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कॉंग्रेसला भाजपपेक्षा जास्त म्हणजेच १७-१८ जागा मिळतील, असे सांगितले जात होते. विशेष म्हणजे एमजीपीला ५-७ जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. त्यामुळे एमजीपी किंग मेकरच्या भूमिकेत पुढे आला होता. यावेळी एमजीपीचे सुदीन ढवळीकर यांनी कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांसोबत बैठका केल्या होत्या. भाजपच्या बैठकीत त्यांनी प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध दर्शवला होता. तसेच मुख्यमंत्रीपद एमजीपीला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. एमजीपीला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर प्रमोद सावंत यांचे नाव वगळून भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात विश्वजित राणे यांचे नाव पुढे होते.

विश्वजित राणे यांची राज्यपाल भेट -

काही दिवसांपूर्वी विश्वजित राणे यांनी राज्यपाल पिल्लई यांची भेट घेतली होती. तेव्हा बोलताना विश्वजित राणे म्हणाले होते, की ही खासगी भेट होती. माझ्या मतदारसंघातील कामांसंदर्भात मला त्यांच्यासोबत चर्चा करायची होती. तसेच त्यांचे आशिर्वाद घ्यायचे होते. या भेटसंदर्भात विश्वजित राणे यांनी पुरते मौन स्विकारले आहे. तसेच भाजपच्या गोटातूनही कुणी प्रतिक्रिया दिलेली नाही. या भेटीनंतर अशी चर्चा सुरू झाली, की विश्वजित राणे मुख्यमंत्रीपदाच्या शर्ततीत आहेत. यासाठी त्यांनी एमजीपी आणि काही भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे. भाजपचा हा गट सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली होती.

हेही वाचा - Goa Assembly Election Result 2022 : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा; 'नोटा'पेक्षाही कमी मते

गोव्याच्या राणे घराण्याचा इतिहास -

माजी मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुरब्बी राजकारणी प्रतापसिंह राणे गेल्या ३२ वर्षांपासून पोरियम या मतदारसंघातून निवडून येत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने त्यांना दोन पर्याय दिले होते. पोरियम येथून स्वतः लढा किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव पुढे करा. त्यामुळे विश्वजित राणे येथून निवडणूक लढण्यास उत्सूक होते. पण प्रतापसिंह यांनी विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या राणे यांचे नाव पुढे केले. दिव्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांना एकूण 17,816 मते पडली. सर्वाधिक मताधिक्याने त्या निवडून आल्या. वलपोई येथून विश्वजित राणे यांना 12,262 मते पडली. त्यांचाही मोठ्या मतांनी विजय झाला आहे. प्रतापसिंह राणे यांना भाजपने आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. यावरुन राणे कुटुंबीयांचे भाजपमधील वजन दिसून येते.

प्रमोद सावंत यांचा कसाबसा विजय -

सांकळी मतदारसंघातून प्रमोद सावंत निवडणुकीत उभे होते. त्यांना एकूण 12250 मते पडली. येथून कॉंग्रेसच्या धर्मेश संगलानी यांनी त्यांना कडवी टक्कर दिली होती. संगलानी यांना एकूण 11,584 मते पडली. मतमोजणीच्या वेळी सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये संगलानी यांनी सावंत यांना मागे टाकले होते. सावंत हरतात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण अखेरच्या फेऱ्यांमध्ये सावंत यांनी गती पकडली. त्यांचा अगदी निसटता विजय झाला. सावंत विजयी ठरले असले तरी त्यांची मतदारसंघावर पकड नव्हती आणि प्रभावही नव्हता हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.

राणे कुटुंब भाजपच्या सोईचे -

विश्वजित राणे हे प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. प्रतापसिंह राणे यांच्यानंतर विश्वजित राणे यांनी राणे कुटुंबीयांचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांची पत्नी दिव्या याही आता राजकारणात उतरल्या आहेत. पोरियम या पारंपरित मतदारसंघातून त्या मोठ्या मतांनी निवडून आल्या आहेत. विश्वजित यांना प्रतापसिंह राणेंचा पाठिंबा आहे. अशा वेळी मुख्यमंत्रीपदी एक मजबूत उमेदवार असणे भाजपच्या हिताचे आहे. मनोहर पर्रिकर यांच्यानंतर गोव्यात कुणी भाजपला यश मिळवून देऊ शकत असेल तर ते नाव विश्वजित राणे आहे, असे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची -

मतमोजणी झाल्यानंतर भाजपच्या गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली होती. यावेळी त्यांनी प्रमोद सावंत यांचे नाव घेण्याचे सोईस्कर टाळले होते. त्याला भाजपमधील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. पण गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार यात फडणवीस यांची महत्त्वपूर्ण भूमिका असेल हे मात्र नक्की आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हा अधिकार फडणवीस यांना दिला आहे.

प्रमोद सावंत उत्तम मुख्यमंत्री

भाजपने राज्यात 2022 च्या निवडणुका मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या आहेत. मात्र मागच्या तीन वर्षात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सावंत यांनी सरकार स्थिर ठेवले. प्रसंगी काँग्रेस आमदारांना आपल्या पक्षात घेऊन राज्य केले. त्यामुळे ज्या काही मुख्यमंत्री पदासाठी लागणाऱ्या कसोट्या होत्या त्या सावंत यांनी मागच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पूर्ण केल्या. म्हणूनच सध्या तरी ते या पदासाठी योग्य असल्याचे बोलले जात आहे, असे राजकीय विश्लेषक पांडुरंग गुरव यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यात राणेंची पकड

मात्र विश्वजित राणे यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे प्रतापसिंह राणे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळले आहेत. त्यातच मागच्या 5 दशकात राणे कुटुंबियांचे गोव्याच्या राजकारणावर प्रभुत्व आहे. प्रथमतः सिनियर राणे हे राज्याचे 17 वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यातच मागच्या 5 वर्षात स्वतःच विश्वजित राणे हे आरोग्यमंत्री आहेत आणि तेव्हापासून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांची इच्छा अधिक प्रबळ झाली आहे. त्यातच राणे दाम्पत्य हे या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडणून आले आहे. त्यातच उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही काँग्रेस नेत्यांना आपल्यासोबत आणण्याची किंवा भाजपातील काही नेत्यांना काँग्रेस सोबत नेऊन मुख्यमंत्री होण्याची ताकद डॉ राणे यांच्यात आहे. म्हणून पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यास त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते.

प्रमोद सावंत सर्वात निष्फळ मुख्यमंत्री

डॉ प्रमोद सावंत हे आतापर्यंतचे सर्वात निष्फळ मुख्यमंत्री राहिले आहेत. राज्यातील महत्वाचे मायनिग, बेरोजगारी किंवा पर्यावरण विषयी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांनी भाजपला त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळाली. त्यामुळे कदाचित पक्षाने ठरविल्यास त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकते, असे गोमंतक चे संपादक आणि संचालक राजू नायक यांनी सांगितले. मात्र विश्वजित राणे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी मागच्या टर्म पासून खदखद आहे. त्यांना आता एक आयतीच संधी प्राप्त झाली आहे. त्यांनी ही संधी सोडली तर तो त्यांचा सर्वात मोठी चूक ठरणार आहे. त्यामुळे विश्वजित यांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यात जर ते केंद्रीय नेतृत्वाला राजी करण्यात यशस्वी झाले तर त्यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागू शकते.

Last Updated : Mar 15, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.