ETV Bharat / bharat

Twitter suspends journalists : एलोन मस्कबद्दल लिहिणाऱ्या पत्रकारांना ट्विटरने केले निलंबित - खासगी आयुष्यावर लिहिने चुकीचे

गुरुवारी न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएनच्या ट्विटरने पत्रकारांची खाती निलंबीत ( Twitter suspends journalist accounts ) केली. खासगी आयुष्यावर लिहिने चुकीचे आहे. त्यामुळे त्याचा कुटूंबावर परिणाम होतो असे ट्विटर करत मस्ककडून सांगण्यात आले आहे.

Twitter suspends journalists
पत्रकारांची खाती निलंबीत
author img

By

Published : Dec 16, 2022, 1:41 PM IST

हैदराबाद: ट्विटरने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि त्याचे नवीन मालक एलोन मस्कबद्दल ( Twitter suspends journalist accounts ) लिहीणार्‍या पत्रकारांची खाती निलंबित केली. ज्यात न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन आणि इतर पत्रकारांचा समावेश आहे. ट्विटरने या पत्रकारांची खाती का काढली आणि त्यांचे प्रोफाइल का हटवले याचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

खासगी आयुष्यावर लक्ष : एलोन मस्कच्या ( Elon Musk ) खाजगी जेटच्या उड्डाणाविरोधाची माहिती काही पत्रकारांनी दिली होती. ती माहिती देणार्‍या पत्रकारांच्या खात्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. ट्विटरने बुधवारी देखील त्यांचे नियम बदलून दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्याविषयी संमतीशिवाय माहिती शेअर करण्यास मनाई केली. गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आलेल्या अनेक पत्रकारांनी त्या नवीन धोरणाबद्दल आणि ते लादण्याच्या मस्कच्या तर्काबद्दल लिहिले. ज्यात लॉस एंजेलिसमध्ये असताना पत्रकारांनी त्याविषयी काहीतरी लिहीले होते. ज्याचा मंगळवारी रात्री त्याच्या कुटुंबावर परिणाम झाला. त्या घटनेवर मस्क यांनी गुरुवारी ट्विट केले, “दिवसभर माझ्यावर टीका करणे पूर्णपणे ठीक आहे, परंतू मी जिथे आहे. तिथले माझ्या खासगी आयुष्यावर जर नजर ठेवली जात असेल ( journalists wrote about Elon Musk ) आणि त्यामुळे माझे कुटुंब धोक्यात येत असेल तर ते योग्य नाही.”

सीएनएनकडून पत्रक जारी : "डॉक्सिंग" म्हणजे एखाद्याची ओळख, पत्ता किंवा इतर वैयक्तिक तपशील ऑनलाइन उघड करणे. सीएनएनने एका निवेदनात म्हटले आहे की "सीएनएनच्या अनेक पत्रकारांचे आवेगपूर्ण आणि अन्यायकारक निलंबन चिंताजनक आहे" "ट्विटरची वाढती अस्थिरता ट्विटर वापरणाऱ्या प्रत्येकासाठी चिंतेची बाब आहे". "आम्ही ट्विटरला स्पष्टीकरण मागितले आहे आणि त्या प्रतिसादाच्या आधारे आम्ही ट्विटरसोबत आमच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करू."

निलंबन चिंताजनक : आणखी एक निलंबित पत्रकार, मॅशबल या टेक न्यूज आउटलेटचे मॅट बाइंडर यांनी सांगितले की, सीएनएन रिपोर्टरच्या निलंबनापूर्वी ओ’सुलिव्हनने पोस्ट केलेला स्क्रीनशॉट शेअर केले. त्यानंतर लगेचच गुरुवारी रात्री त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. स्क्रीनशॉटमध्ये लॉस एंजेलिस पोलिस विभागाचे निवेदन दर्शविले गेले आहे. जे असोसिएटेड प्रेससह अनेक मीडिया आउटलेट्सना पाठवले गेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.