ETV Bharat / bharat

भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदुत कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक - Abdulhaq Azad

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा घेतला आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देशातून पळून गेले आहेत. सुत्राच्या माहितीनुसार अफगाणिस्तान राजदूत कार्यालयाच्या ट्विटर हँडलमधून संशयास्पद अॅक्टिव्हिटी झाल्याचे दिसून आले.

ट्विटर इंडिया
ट्विटर इंडिया
author img

By

Published : Aug 16, 2021, 4:32 PM IST

Updated : Aug 16, 2021, 5:23 PM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची सत्ता येत असताना त्याचा फटका भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयालाही बसला आहे. या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक झाले आहे. याबाबतची माहिती अफगाणिस्तान राजदूत कार्यालयाच्या माध्यम सचिव अब्दुलहक आझाद यांनी सांगितले.

तालिबानींनी काबुलवर रविवारी कब्जा मिळविला आहे. त्यापूर्वीच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हे पदावरून पायउतार झाले. त्यानंतर त्यांनी देशातून पळ काढला आहे. त्यावर अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयाच्या ट्विटरवरून घनी यांच्यावर टीका करण्यात आली. त्याबाबत अफगाणिस्तान राजदूत कार्यालयाच्या माध्यम सचिव अब्दुलहक आझाद म्हणाले, की @AfghanistanInIN हा ट्विटर हँडल हाताळणे अशक्य झाले आहे.

भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालया
भारतामधील अफगाणिस्तानच्या राजदूत कार्यालयाचे ट्विटर

मित्राने हा स्क्रीनशॉट पाठविला आहे. ट्विटरचे लॉग इनचा प्रयत्न करूनही शक्य होत नाही. हॅक झाल्याचे दिसत आहे.

हेही वाचा-तालिबानने जिंकला अफगाणिस्तान ... संयुक्त राष्ट्रसंघाने आज बोलाविली आपात्कालीन बैठक

दरम्यान, काबुलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यावसायिक उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. विमानतळावर लोकांनी कर्दी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. एअर इंडियाचे 129 प्रवासी असलेले विमान अफगाणिस्तानवरून नवी दिल्लीला रविवारी पोहोचले. अफगाणिस्तानमधील स्थितीवर जवळून देखरेख करण्यात येत असल्याचे सरकारमधील सूत्राने सांगितले. दरम्यान, भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा-अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून पळाले

तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळविल्याने तेथील परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषेदेने(युएनएस) आज आपत्कालीन बैठक बोलाविली आहे.

अब्दुल घनी होणार अफगाणिस्तानचे राष्ट्रपती

रिपोर्टसच्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील नवीन सरकारचे नेतृत्व हे मुल्लाह अब्दुल घनी बारादार करणार आहेत. 53 वर्षीय बारादार हे कंदाहारमध्ये लहानाचे मोठे झाले. अब्दुल घनी हे तालिबानी संघटनेचे सहसंस्थापक आहेत. त्यांच्यासोबत मुल्लाह मोहम्मद ओमर हे तालिबानी संघटनेचे संस्थापक आहे. बारादार यांनी पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या विनंतीनंतर त्यांना 24 ऑक्टोबर 2018 मध्ये पाकिस्तानची मुक्तता केली. बारादार हे तालिबानच्यावतीने सरकारसोबत करण्यात येणाऱ्या वाटाघाटींचे नेतृत्व करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि नागरिकांचे भवितव्य अधिक चांगले राहिल, असे बारादार यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओमधून सांगितले आहे.

हेही वाचा-काबुल विमानतळावर दुर्घटना; अफगाणिस्तानातून पळण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा मृत्यू

Last Updated : Aug 16, 2021, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.