200 दशलक्षाहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे ईमेल ऍड्रेस (email addresses of 200 million users leaked) हॅक (Twitter Hacked) करुन, नंतर ते ऑनलाईन हॅकिंग फोरमवर पोस्ट केले. इस्रायलची सायबर सुरक्षा कंपनी हडसन रॉकने (Israeli cyber security company Hudson Rock) ही माहिती दिली आहे. याआधी देखील कमीतकमी 400 दशलक्ष ईमेल ऍड्रेस आणि फोन नंबर चोरीला गेल्याची तक्रार होती. मात्र हॅकर्सची ओळख किंवा लोकेशन अद्याप मिळालेले नाही.
इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग कंपणी (Israeli cyber security company Hudson Rock) हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल (Alon Gal) यांनी लिंक्डइनवर लिहिले की, 'या अश्या घटनांमुळे दुर्दैवाने बरेच हॅकिंग, लक्ष्यित फिशिंग आणि डॉक्सिंग होईल'. तसेच मी बघितलेल्या अनेक घटनांपैकी ही एक निर्धारीत लक्ष्य करुन केलेली महत्वाची घटना असल्याचे देखील त्यांनी म्हणटले आहे.
तसेच ईमेल ऍड्रेस हॅक झाल्याचा दावा आणि इस्रायलची सायबर सुरक्षा कंपनी हडसन रॉकने अहवाल (Report) प्रकाशित करुन दोन आठवडे उलटले तरीसुध्दा ट्विटरने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया जारी केलेली नाही. इस्त्रायली सायबर सिक्युरिटी-मॉनिटरिंग कंपणी हडसन रॉकचे सह-संस्थापक एलोन गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट केली होती. मायक्रो-ब्लॉगिंग साइटने अहवालाला दिलेला प्रतिसादानंतर देखील, अज्ञात राहिल्याने ट्विटरने या प्रकरणात अपारदर्शक दृष्टिकोन स्वीकारल्याचे मानले जात आहे.
हॅव आय बीन पॉन्डेड या ब्रीच- नोटिफिकेशन साइटचे निर्माते ट्रॉय हंट यांनी लीक झालेला डेटा पाहिला आणि ट्विटरवर म्हटले की, जसे सांगितल्या गेले आहे, तसाच हा प्रकार असल्याचे जाणवते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अब्जाधीश एलोन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. ताब्यात घेतल्यानंतर, मस्कने जाहिरातदारांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले. जाहिरातदारांना दिलेल्या संदेशात, मस्क म्हणाले होते की, त्यांनी ट्विटर विकत घेतले, कारण ते सभ्यतेचा आधारस्तंभ आहे आणि मानवतेला मदत करेल.