नवी दिल्ली : अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांनी ट्विटरची कमान संभाळल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. ट्विटरने नुकतीच आपली पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे ट्विटर आणखी लोकाभिमुख होत असल्याचे दिसत आहे. नुकतेच ट्विटरने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या यूजरच्या खात्यावर कठोर कारवाई करण्यास शिथिलता आणली आहे. सातत्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्विटर खातेधारकाचे खाते निलंबित करण्यात येतील. मात्र वादग्रस्त ट्विट असल्यास ते काढण्यास सांगितले जाईल, असेही ट्विटरच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
खाते निलंबनाबाबत करता येणार अपील : ट्विटरने आपल्या मायक्रो ब्लॉगवर शनिवारी याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. एखाद्या खातेधारकाला खाते निलंबनाविषयी कोणतीही तक्रार असल्यास 1 फेब्रुवारीपासून त्यांना तक्रार करता येणार असल्याची माहिती ट्विटरने दिली आहे. त्यामुळे एखाद्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ट्विटर खाते निलंबित केल्यास त्या खातेधारकाला अपील करता येणार आहे. त्यामुळे ट्विटरच्या पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या खातेधारकाला पुन्हा खाते सुरु करता येणे यामुळे शक्य झाले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतचे खाते निलंबीत : ट्विटरवर नागरिकांच्या भावना भडकवल्याचा आरोप अभिनेत्री कंगणा राणावतवर करण्यात आला होता. याबाबत अनेक नागरिकांनी कंगना राणावतचे ट्विटर खाते बंद करण्याची मागणी केली होती. लोकांच्या भावना भडकवल्याचा आरोप झाल्यामुळे ट्विटरने कंगना राणावतचे ट्विट खाते निलंबीत केले होते. कंगनासह देशातील अनेक बड्या नेत्यांचेही ट्विटरचे खाते निलंबीत करण्यात आले होते.
नुकसानीमुळे ट्विटरने बदलले धोरण : ट्विटरवर अनेक खातेधारक धार्मीक द्वेश पसरवण्याचे काम करत असल्याने ट्विटरने अनेक खाते निलंबीत केले होते. त्यामुळे कंगना राणावतसह अनेक धार्मीक नेत्यांचा यात समावेश होता. मात्र या पॉलिसीमुळे ट्विटरचे नुकसान झाल्याचे पुढे आले. त्यामुळे एलन मस्क यांनी ट्विटरची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी अगोदर पॉलिसी बदलण्याचे काम केले. त्यामुळे कंगना राणावतसह देशभरातील अनेक नेत्यांना या नव्या पॉलिसीचा फायदा झाला आहे. मात्र ट्विटरला नुकसान होत असल्यामुळे ट्विटरने आपली पॉलिसी बदलल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ट्विटरने अनेक खाते रिस्टोअर केली आहेत.
हेही वाचा - IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार