ETV Bharat / bharat

BJP MLA Watching Porn : भाजपच्या आमदाराने भर विधानसभेतच पाहिले 'पॉर्न व्हिडिओ', सोशल मीडियावर झाला व्हायरल - व्हिडीओ झाला व्हायरल

त्रिपुरा विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारावर अधिवेशनादरम्यान अश्लील चित्रफीत पाहण्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप आमदार जादब लाल नाथ हे त्यांच्या टॅबलेटवर लैंगिक सामग्री पाहताना दिसले आणि त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

Tripura BJP MLA caught while watching porn inside Assembly video goes viral
भाजपच्या आमदाराने भर विधानसभेतच पाहिले 'पॉर्न व्हिडीओ', सोशल मीडियावर झाला व्हायरल
author img

By

Published : Mar 30, 2023, 6:17 PM IST

आगरतळा (त्रिपुरा): त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार वादात सापडला आहे. अधिवेशनादरम्यान भाजप आमदार जादब लाल नाथ हे विधानसभेच्या इमारतीत लैंगिक सामग्री पाहताना दिसले होते. जादब लाल नाथ, हे सीपीआयएम नेते होते आणि 2018 च्या आधी भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. नाथ यांनी 2018 ची निवडणूक सीपीआयएम उमेदवार आणि माजी स्पीकर रामेंद्र चंद्र देबनाथ यांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला.

सोशल मीडियावर व्हायरल: तथापि, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्यातील बागबाशा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्रिपुरा विधानसभा भवनातील सूत्रांनी सांगितले की, विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी ही घटना घडली. मात्र, बुधवारी रात्री उशिरापासून भाजप आमदाराने विधानसभेच्या अधिवेशनात लैंगिक सामग्री पाहण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॅब्लेटवर पाहिले व्हिडीओ: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, भाजप आमदार जादब लाल नाथ यांच्या हातात एक टॅब्लेट धरलेला दिसत आहे, ज्यावर ते लैंगिक सामग्री पाहत असल्याचा दावा केला जात आहे. नेटिझन्सनी या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात निवडून आलेल्या जबाबदार प्रतिनिधीने असे वागणे हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. अनेक प्रयत्न करूनही विधानसभेचे अध्यक्ष विश्व बंधू सेन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

यापूर्वीही घडल्यात अशा घटना: याशिवाय, भारतात असेंब्लीच्या आत लैंगिक सामग्री पाहण्याची अनेक उदाहरणे आहेत. युनायटेड किंगडमचे खासदार नील पॅरिश यांना गेल्या वर्षी चेंबरमध्ये पॉर्न पाहिल्याचे कबूल केल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. याशिवाय, ब्रिटनच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्हच्या 65 वर्षीय खासदाराने एप्रिल 2022 मध्ये हाऊस ऑफ कॉमन्स चेंबरमध्ये आपल्या सेल फोनवर जाणूनबुजून पोर्नोग्राफी पाहत असल्याची कबुली दिली होती, त्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यापूर्वीही भारतात अनेक विधानसभांमध्ये आमदार अशाप्रकारे व्हिडीओ पाहताना आढळून आलेले आहेत.

हेही वाचा: अर्रर्र काय सांगता, चक्क कंडोमचा कॅफे, पहा आहे तिथे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.