गोंडा (उत्तर प्रदेश) Triple Talaq in Gonda : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपल्या आजारी भावाचा जीव वाचवण्यासाठी बहिणीला किडनी दान करणं चांगलंच महागात पडलंय. यामुळं संतापलेल्या पतीनं आपल्या पत्नीला सौदी अरेबियातून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तीन तलाक दिलाय. यानंतर पीडित महिलेनं पतीविरुद्ध धनेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पोलीस आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत असल्याचं एएसपी राधेश्याम यांनी सांगितलंय.
नेमकं प्रकरण काय : हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील धनेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतापूरचं आहे. या गावातील रहिवासी पीडितेचा विवाह गावातीलच रशीदसोबत 20 वर्षांपूर्वी झाला होता. रशीद हा रोजगारासाठी सौदी अरेबियात राहतो. पीडितेनं सांगितलं की, त्यांना मुलगा नाही. यामुळं तिच्या पतीनं दुसरं लग्न केलंय. तिच्या भावाची प्रकृती काही दिवसांपासून ढासळत होती. त्याच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथल्या डॉक्टरांनी त्याची एक किडनी खराब झाली असून त्याला लवकरात लवकर किडनी प्रत्यारोपणाची गरज असल्याचं सांगितलं.
एका महिलेनं तिच्या पतीवर व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे घटस्फोटाचा आरोप केलाय. प्रकरण जुनं असल्यानं तक्रारीवर कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशीनंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल. - एएसपी राधेश्याम राय
पीडिता काय म्हणाली : पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, भावाला किडनीची गरज असल्यानं तिनं भावाला किडणी देण्याचं मान्य केलं. यासाठी तिनं पतीकडून संमतीही घेतली होती. 5 महिन्यांपूर्वी मुंबईतील एका रुग्णालयात पीडितेची किडनी काढण्यात आली होती, जी डॉक्टरांनी तिच्या भावावर प्रत्यारोपित केली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती गोंडा इथल्या तिच्या सासरच्या घरी आली. घरी पोहोचल्यानंतर सौदी अरेबियात राहणारा तिचा नवरा संतापल्याचं तिनं सांगितलं. यानंतर किडनीच्या बदल्यात तिच्याकडं 40 लाख रुपयांची मागणी केली. तिनं नकार दिल्यानंतर पतीनं 30 ऑगस्ट रोजी तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून तिला तीन तलाक दिला. घटस्फोटानंतरही ती तिच्या सासरच्या घरी राहिली. मात्र, आता सासरचे लोक तिला घरात राहू देत नाहीत.
हेही वाचा :