ETV Bharat / bharat

Deoghar Trikut Ropeway Accident Updates : त्रिकुट रोपवेवर दुर्घटना; 18 तासांपासून अडकलेत 48 जण, एका महिलेचा मृत्यू

देवघर येथील त्रिकुट येथे रोपवे दुर्घटना ( trikoot ropeway accident ) झाली आहे. येथे रोपवेत 18 तासांपासून 48 जण अडकले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र त्यात यश मिळत नाही. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून बचावकार्य सुरू आहे, मात्र उंची जास्त असल्याने बचावकार्य होत नसल्याने लोक हवेत लटकले आहेत.

deoghar trikut ropeway accident updates
deoghar trikut ropeway accident updates
author img

By

Published : Apr 11, 2022, 11:51 AM IST

Updated : Apr 11, 2022, 12:49 PM IST

देवघर (झारखंड) - देवघर येथील त्रिकुट येथे रोपवे दुर्घटना ( trikoot ropeway accident ) झाली आहे. त्रिकुट रोपवे दुर्घटनेनंतर तेथे बचावकार्य सुरू आहे. तेथे अडकलेल्या ४८ पर्यटकांना बाहेर काढण्याचे आणि हेलिकॉप्टरमधून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण लोकांना बाहेर काढण्यात हवाई दलाला अद्याप यश मिळालेले नाही. येथे 12 ट्रॉलीमध्ये 48 जण अजूनही हवेत अडकलेले आहेत. त्यांना अडकून जवळपास 18 तास झाले आहेत. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने महिलेच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

त्रिकुट रोपवेवर दुर्घटना

त्रिकुट पर्वताच्या रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खाली आणण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर ट्रॉलीजवळ पोहोचले आणि परत आले. याचे कारण हवेत लटकलेल्या 12 ट्रॉलींमधून लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नाही. यासोबतच ट्रॉलीच्या अगदी जवळ मोठमोठे खडक आहेत, त्यामुळे हेलिकॉप्टरलाही धडकण्याचा धोका आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांची सर्वात मोठी समस्या आहे. अपघात होऊन जवळपास 17 तास उलटले असून सर्व 48 जण हवेत लटकले आहेत. त्यांच्याकडे ना अन्न आहे ना पाणी. अशा परिस्थितीत त्यांना लवकरात लवकर सुरक्षितपणे उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. 2500 फुटांपेक्षा जास्त उंचीमुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमसह लष्कराचे जवान आणि स्थानिक पोलीस दल उपस्थित आहे.

त्रिकुट रोपवेवर दुर्घटना

काय आहे संपूर्ण प्रकरण - रविवारी सायंकाळी देवघर जिल्ह्यातील मोहनपूर ब्लॉक अंतर्गत त्रिकुट डोंगरावर असलेल्या रोपवेच्या ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये जिल्हा प्रशासनाने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ट्रॉलीची दोरी अडकल्याने अनेक पर्यटक ट्रॉलीमध्ये अडकले.

Last Updated : Apr 11, 2022, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.