ETV Bharat / bharat

Towel Left In Womb : ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिला टॉवेल..त्यानंतर घडले असे काही.. - गर्भवती महिलेच्या पोटात टॉवेल राहून गेला

उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे ऑपरेशनदरम्यान एका गर्भवती महिलेच्या पोटात टॉवेल राहून गेला. (towel left in womb of women during operation). डॉक्टरांनी मात्र थंडीमुळे पोटात दुखत असल्याचे सांगून तिला डिस्चार्ज दिला होता. वाचा काय आहे हे संपूर्ण प्रकरण.. (operation in amroha)

Towel Left In Womb
महिलेच्या पोटात राहिला टॉवेल
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:52 PM IST

पाहा व्हिडिओ

अमरोहा (उ. प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे 20 डिसेंबर रोजी प्रसूती वेदना होत असल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ऑपरेशन नंतर डॉक्टरांकडून तिच्या पोटात टॉवेल राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (towel left in womb of women during operation). ही बाब निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव सिंघल यांनी बुधवारी चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी अद्याप पीडितेने कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. (operation in amroha)

काय आहे संपूर्ण प्रकरण : नौगावाना सादत पोलीस स्टेशन हद्दीतील बनशेडी गावातील रहिवासी समशेर अली यांनी सांगितले की, प्रसूतीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने 20 डिसेंबर रोजी पत्नी नजरानाला डॉ. मतलुब संचालित सैफी नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. येथील ऑपरेशनदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे महिलेच्या पोटात टॉवेल राहून गेला. नजरानाने पोटदुखीची तक्रार डॉ. मतलुब यांच्याकडे केली असता, डॉक्टरांनी तिला पाच दिवसांनी म्हणजे 25 डिसेंबर रोजी थंडीचे कारण सांगून घरी पाठवले.

अशाप्रकारे समोर आले सत्य : पीडित अलीने पुढे सांगितले की, जेव्हा घरी आल्यानंतरही नजरानाच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही तेव्हा तिला अमरोहा येथील डॉ गर्ग यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्या पोटाचे ऑपरेशन करताना पोटात टॉवेल असल्याचे आढळून आले. त्यानंतर नजरानाचे पुन्हा अमरोहा येथे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशन दरम्यान पोटातून टॉवेल बाहेर आल्याने कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली.

तपास होणार : आरोग्य विभागाला ही बाब समजताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर सीएमओ डॉ. राजीव सिंघल यांनी घाईघाईने या प्रकरणाचा तपास नोडल ऑफिसर डॉ. शरद यांच्याकडे सोपवला. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. सीएमओ म्हणाले की, शमशेर अली यांनी अद्याप लेखी तक्रार दिली नसली तरी घटनेचा तपास केला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.