कुल्लू - सतत हिमवृष्टी होत असल्याने येथील रस्ते पूर्णपणे बर्फमय झाले आहेत. परिणामी येथील दैनंदिन जीवन काही प्रमाणात थंडावले असून दुकानेही बंद झाली आहेत. हिमवृष्टी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटकांनी कुल्लूमध्ये हजेरी लावली. मात्र, बर्फाच्या चादरीवर गाडी फसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी स्थानिकांनी त्यांना बर्फातून गाडी बाहेर काढण्यास मदत केली.
संबधित गाडीमध्ये दोघे जण होते. माहितीनुसार ते 25 नोव्हेंबरला कुल्लू येथे आले. रविवारी दुपारी ते जलोरीकडे निघाले. मात्र, त्यांची गाडी जलोरीत फसली. जलोरी खिंडीतील दुकान व रेस्टॉरंट चालकांच्या मदतीने गाडी खानाग ते जलोरी खिंडीकडे नेण्यात आली आणि नंतर महिला ड्रायव्हरने जलोरीतून गाडी बाहेर काढली. बर्फाच्या चादरीवर वाहन चालविणे धोकादायक आहे.