ETV Bharat / bharat

Ramoji Film City : 'रामोजी फिल्म सिटी'सारखी फिल्म सिटी संपूर्ण देशात बनली पाहिजे! - रामोजी फिल्मसिटीसारखी फिल्मसिटी

केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर काश्मीरसह संपूर्ण देशात फिल्म सिटी बनवण्याचे आवाहन केले. जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 परिषदेदरम्यान ईटीव्ही भारतशी त्यांनी विशेष संवाद साधला.

TOURISM MINISTER G KISHAN REDDY
केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी
author img

By

Published : May 23, 2023, 6:07 PM IST

पहा काय म्हणाले केंद्रीय पर्यटन मंत्री

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 परिषदेदरम्यान केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी काही पर्याय सुचवले आहेत. ईटीव्ही भारतशी खास संवाद साधताना पर्यटन मंत्री म्हणाले, 'माझे मूळ राज्य तेलंगणामध्ये रामोजी फिल्म सिटी आहे. हा एक मोठा स्टुडिओ आहे. रामोजी फिल्मसिटीच्या चेअरमनचा नारा आहे की, तुम्ही फक्त पैसे किंवा चेक आणा आणि येथून फिल्म तयार करून घेऊन जा. म्हणजेच तुम्हाला इथे सर्व काही मिळेल. काश्मीरमध्येही अशीच फिल्म सिटी व्हायला हवी.'

'जम्मू काश्मीरमध्येही फिल्म स्टुडिओ असावेत' : पर्यटन मंत्री म्हणाले की, 'रामोजी फिल्म सिटीमध्ये सर्व सुविधा आहेत. त्याचप्रमाणे सर्वत्र स्टुडिओ उभारले पाहिजेत. रामोजी राव फिल्म सिटी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. असेच स्टुडिओ जम्मू काश्मीरसारख्या राज्यांमध्येही असावेत. त्यामुळे आगामी काळात चित्रपट निर्मात्यांची सोय होईल. तसेच स्थानिकांना रोजगार मिळेल. यासोबतच जगभरातील चित्रपटसृष्टीत जम्मू-काश्मीरसह भारताचे नाव रोशन होईल'.

'पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कृती योजना' : ते पुढे म्हणाले की, 'मी काश्मीरसह प्रत्येक पर्यटन स्थळावर रामोजी सारख्या फिल्म सिटीजची वकिली करतो आहे.' केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी पुढे म्हणाले की, 'भारतातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक कृती योजना आखल्या जात आहेत. हे करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे श्रीनगर आणि जम्मू-काश्मीर आहे. सर्व काही सकारात्मक दिशेने जात आहे. सर्व संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे'.

'पाकिस्तानने आमच्या कामात हस्तक्षेप करू नये' : चीन आणि पाकिस्तानवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, 'आम्ही आमच्या प्रदेशाबद्दल, देशाबद्दल सकारात्मक विचार करत आहोत. पाकिस्तानने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी आमच्या कामात हस्तक्षेप करू नये. पाकिस्तानची स्थिती लज्जास्पद आहे. आमचा व्यवसाय चालवण्यासाठी आमच्याकडे राजकारणी आणि इतर भागधारक आहेत'. ते पुढे म्हणाले की, 'आम्हाला आमचा व्यवसाय चालवण्यासाठी दहशतवादी संघटना किंवा कोणाच्याही परवानगीची गरज नाही. आम्हाला आमच्या लोकांचा आणि आमच्या संविधानाचा पाठिंबा आहे'.

हेही वाचा :

  1. UPSC Result 2022 Declares : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; टॉप पाचमध्ये मुलींचाच नंबर, 'असा' पाहा निकाल
  2. Narendra Modi Australia Visit : भारत-ऑस्ट्रेलिया संबंध 3C, 3D आणि 3E वर आधारित, जाणून घ्या सिडनीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी
  3. Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह यांनी फेटाळले लैंगिक शोषणाचे आरोप, म्हणाले, 'डोनाल्ड ट्रम्पही..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.