- मुंबई - मराठी भाषेला लाभलेल्या सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- सॅनफ्रान्सिस्को - टिकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्सने वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कंपनीने अमेरिकेतील इलिनॉसिस राज्याला ९२ दशलक्ष डॉलर भरण्याची तयारी दर्शविली आहे.
वैयक्तिक गोपनीयतेचा भंग; टिकटॉक अमेरिकेतील राज्याला देणार ९२ दशलक्ष डॉलर
- पुणे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात १२ वी आणि माध्यामिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात १० वी च्या लेखी परीक्षा एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर; एप्रिल-मे २०२१ मध्ये होणार परीक्षा
- मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीन स्फोटक व एक धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रामध्ये मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आलेली आहे.
अँटिलिया प्रकरण : अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र आले समोर
- मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या 6 हजाराच्या वर होती, 22 फेब्रुवारीला त्यात किंचित घट झाली होती. मात्र, त्यात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज तिसऱ्या दिवशीही 8 हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळून आली आहे. 8333 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज तिसऱ्या दिवशीही 8 हजाराहुन अधिक रुग्ण, 48 मृत्यू
- कोलकाता- भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेप्रमाणे जाहीर केल्याचा मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी संशय व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठीच निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा आरोपही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केला.
'पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यातील निवडणुका ही मोदी किंवा शाह यांची सूचना'
- नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेतली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. पाचही राज्यातील निवडणुका कोरोना महामारी डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जातील, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुका नियोजित आहेत.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, वाचा सविस्तर...
- नांदेड - एसटी महामंडळाच्या वाहकांना बसेसमध्ये तिकीट देण्यासाठी ईटीआयएम (इलेक्ट्रॉनिक तिकीट व्हेंडिंग मशीन) दिले जाते. मात्र, या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने त्याचा वाहकांना (कंडक्टर) नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच बिघाड झालेल्या मशीनमुळे एका वाहकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तांत्रिक बिघाडामुळे चूक नसतानाही आपली नाहक बदनामी होईल, या भीतीने माहूर आगारातील वाहकाने आज (दि. २६) सकाळी एसटी बसमध्येच आत्महत्या केली. संजय संभाजी जानकर (वय ४९) असे वाहकाचे नाव आहे.
धक्कादायक..! नादुरुस्त तिकिट मशीनमुळे वाहकाची एसटीमध्येच आत्महत्या
- मुंबई - संजय लीला भन्साळीच्या पद्मावतमध्ये महारावल रतन सिंगची भूमिका साकारल्यानंतर बॉलिवूड स्टार शाहिद कपूर पुन्हा ऐतिहासिक चित्रपटात पुन्हा परतण्याची तयारी करत आहे. हिंदवी स्वराज्य आणि मराठा साम्राज्याचा पाया घालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आगामी काळात चित्रपट बनणार असून यात मुख्य भूमिका शाहिद साकारणार असल्याची चर्चा आहे.
शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
- नवी दिल्ली - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण हा एक अतिशय धोकादायक फलंदाज म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार खेळीतून अनेकदा भारतीय संघाला जिंकवून देणाऱ्या युसुफ पठाणने आज निवृत्तीची घोषणा केली. युसुफने ट्विटरवर एक निवेदन जाहीर करून क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. २००७ चा टी-२० आणि २०११चा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो भाग होता.
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती