ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

author img

By

Published : Jun 4, 2021, 3:34 PM IST

Updated : Jun 4, 2021, 10:50 PM IST

top ten news stories around the globel
Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
  1. मुंबई - मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. वाचा सविस्तर
  2. मुंबई - राज्यात अनलॉक संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी केलेला घोषणेनंतर त्यांना आपल्याच वक्तव्यावरून घुमजाव करावा लागला. यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय सांगण्याबद्दल कोणताही श्रेयवाद नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. वाचा सविस्तर
  3. मुंबई - अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या विधी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य शासनाने ही समिती नेमली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून विक्रमी वेळेत आपला अहवाल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले व समितीला धन्यवाद दिले आहे. वाचा सविस्तर
  4. मुंबई - लसीचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर मागवले. या टेंडरला पुरवठादारांनी प्रतिसादही दिला. मात्र, लसीच्या पुरवठयासाठी पुढे आलेल्या कंपन्यांना लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबतचे आपले कायदेशीर व्यवहार सिद्ध करता आलेले नाहीत. यामुळे हे पुरवठादार लसीचा पुरवठा करू शकत नाहीत असे समोर आल्याने पालिका प्रशासनाने ग्लोबल टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे पालिका लसीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. तसेच स्फुटनिक लसीचे भारतातील उत्पादक डॉ. रेड्डीजसोबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाचा सविस्तर
  5. मुंबई - शुक्रवारी वडेट्टीवार यांनी अनलॉक संदर्भातील निर्णय जाहीर केला होता. मात्र, थोड्यात वेळाने मुख्यमंत्री कार्यालयातर्फे हा बदलवण्यात आला. यावरून राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. याला काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्यूत्तर दिले. 'राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी परिस्थिती सुधारत असली, तरी याबाबत अजूनही सावधगिरी बाळगावी लागेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून वडेट्टीवार यांचा निर्णय बदलवल्या गेला असावा, कारण कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला निर्णय बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो', अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिली आहे. वाचा सविस्तर
  6. नवेल - जिल्ह्यातील धानसर या छोट्याशा गावत राहणारे रमझान शेख हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. शिक्षणानंतर रमजान परदेशात जाऊन भरपूर पैसे कमवतील हे घरातील सदस्यांचे स्वप्न होते. परंतु देशभक्तीच्या प्रेमाने रमजानला थांबवले. त्यांनी लोकांना मदत करण्यासाठी, एक संस्था तयार केली आहे ज्याचे नाव 'होपमिरर फाऊंडेशन' आहे. रमझानने सिव्हील अभियांत्रिकीची नोकरी सोडून दिली आहे. होपमिरर फाऊंडेशनच्या माध्यमातून संस्थापक रमजान शेख आणि त्यांची टीम कोरोना कालावधीत गरजूंना रेशन आणि अन्य सहाय्य वितरणाशिवाय, महिला सक्षमीकरणासाठी सॅनिटरी पॅडचे सतत प्रशिक्षण आणि वितरण करीत आहेत. वाचा सविस्तर
  7. सांगली - जत तालुक्यात पडलेल्या धुंवाधार पावसामुळे पूर्व भागातील नाले- ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. या ओढ्यामधून वाट काढत घरी परतणाऱ्या 3 शेतमजूर महिला वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या तिन्ही महिलांना वाचवण्यात यश आले आहे. वाता सविस्तर
  8. नाशिक -यावर्षी पायी वारीबाबत कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा न करता त्वरित वारकऱ्यांसोबत चर्चा करावी. आवश्यक नियमावली तयार करून पायी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीच्या वतीने तुषार भोसले यांनी केले आहे. वाचा सविस्तर
  9. नाशिक - लासलगाव बाजार समिती कांदा लिलावात महिला संस्था सहभागी होताचे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लासलगाव येथील स्थनिक व्यापारी असोसिएशनचे सभासद नाही म्हणून लिलावात सहभागी होता येणार नाही, अशी भूमिका स्थनिक व्यापाऱ्यांनी घेतली मात्र महिला व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारे विरोध होत असल्याने कृषी साधना संचालिका साधना जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
  10. कोरोना काळात अनेक ‘लग्नाळू’ जोडप्यांची कुचंबणा झाली आहे. खरंतर लग्नात अनेक आप्तेष्ट आणि मित्रमंडळी सामील होत असल्यामुळे त्या सोहळयाला समारंभीक रूप येते. परंतु कोरोनाने अनेकांच्या लग्नात विघ्न आणलं. काहींनी पन्नास लोकांच्या उपस्थितीत विवाह उरकले. याच कोरोना काळात चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी लग्नगाठ बांधल्याचे जाहीर केले आहे. वाचा सविस्तर

Last Updated : Jun 4, 2021, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.