- मुंबई - महाराष्ट्रात आज (दि. 27 मे) 21 हजार 273 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 425 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज 34 हजार 370 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 52 लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर 93.02 टक्क्यांवर पोहोचला आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणे वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, चंद्रपुरातील दारू बंदी उठवल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. नववी आणि दहावीच्या आंतरीक गुणांचा आधारावर मूल्यमापन करून दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर आज सादर केला असून याबाबद लवकरच याची घोषणा केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. सध्या सोमवार ते बुधवार वॉक इन, तर गुरुवार ते शनिवार नोंदणी झालेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. काल (27 मे) 41 हजार 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 90 हजार 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सविस्तर वाचा..
- नागपूर - मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. मराठा समाजाने माझा भूमिकेवर नाराज होण्याचे काही कारण नाही, कारण मी एसईबीसी रद्द करा, अशी भूमिका मांडली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. सविस्तर वाचा..
- मुंबई - तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील जिल्ह्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोकणातील जनतेला नुकसान भरपाईसाठी शब्द दिलेला होता. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी 'तो' शब्द पाळलेला आहे. निसर्ग चक्रीवादळाग्रस्तांप्रमाणे तीनपटीने वाढीव रक्कमेने २५२ कोटी रुपयांची भरीव नुकसान भरपाई केल्याची घोषणा केली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई- राज्य शासनाने परवाना धारक रिक्षा चालकांना घोषित केलेल्या दीड हजार रुपये आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणीनंतर अखेर सोमवारी सुरूवात झाली. ऑनलाईन पोर्टलवर पहिल्याच दिवशी तब्बल २२ हजार ०४८ परवाना धारक रिक्षा चालकांनी अर्ज केल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाने दिली. सविस्तर वाचा..
- नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा दिवशीच (27 मे) त्यांच्या घरी सोनपावलांनी एका परीचे आगमन झाले आहे. नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काल (27 मे) त्यांच्या लाडक्या नातीचा गृहप्रवेश झाला आहे. नितीन गडकरी हे ज्यावेळी त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी असतात, तेव्हा बच्चे कंपनीच्या गोतावळ्यात गुंतलेले आजोबा अनेक वेळा नागपूरकरांनी अनुभवले आहेत. काल तर त्यांच्या हातात वाढदिवसाची अमूल्य भेट होती. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगाच रांगा आहे. ही विदारक परिस्थिती कोरोनाचे अनियंत्रित चित्र दर्शवत आहे. या भयान परिस्थीतीवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. आज राहुल गांधींनी टि्वट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईटवर प्रसिद्धी मिळविण्याकरिता युवक मागेपुढे बघत नाहीत. काहीतरी वेगळं करायचं प्रयत्न करतात. वेगळे काही तरी करण्याच्या प्रयत्नात अनेकांचा जीव गेला आहे. तर अनेकदा यामध्ये मुक्या प्राण्यांच्या जीवाची बाजीही लावण्यात आली. अशाच प्रकारचा आणखी एक क्रूर व्हिडीओ समोर आला आहे. एका युट्यूबरने आपल्या पाळीव श्वानाला हायड्रोजन फुग्यांना बांधून उडवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी युट्यूबर गौरव जॉनला अटक केली आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM

Last Updated : May 28, 2021, 1:03 PM IST