- मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी चौकशीचे समन्स सीबीआयने बजावले आहे. परमबीर सिंग यांनी लावलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्यात, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहे. त्यामुळे, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांची बदली झाली आहे. शुक्ला यांनी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या एनआयएच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात शुक्ला यांची महत्वाचा भूमिका होती. सविस्तर वाचा...
- मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील चौथा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाब आणि राजस्थानमध्ये खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबने कर्णधार के.एल. राहुलच्या ९१ धावा व दीपक हुड्डाच्या वादळी ६४ धावांच्या बळावर राजस्थानसमोर २२१ धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानमध्येही पॉवर हिटर फलंदाज असल्याने हा सामना रंगतदार होणार आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला असून 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
- सोलापूर - भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूर येथे वादळी वाऱ्यासह पावसात सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काल मंगळवेढा तालुक्यातील सलगर या गावात भर पावसात सभा घेतली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर शहरात तशाच प्रकारे सभा घेतल्यामुळे पाऊस कोणावर भारी पडणार याची चर्चा रंगू लागली आहे. सविस्तर वाचा..
- कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगानं कारवाई केली आहे. आयोगानं ममता बॅनर्जी यांना 24 तास प्रचार करण्यास बंदी घातली आहे. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठविली. भाजपाच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - मुंबईत सकाळी जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू, तर शुक्रवार ते सोमवार वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम म्हणून काही प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज 6 हजार 905 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली - देशात कोरोना उद्रेक झाला असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. लसीकरणासाठी वयाची अट न ठेवता. गरजेनुसार लसीकरण करावे, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. तसेच गरिबांना मदत म्हणून महिन्याला सहा हजार रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सविस्तर वाचा...
- मुंबई - राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोरोना टास्क फोर्ससोबत कोरोना संकटावर बैठक घेतली आहे. यामध्ये टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ठाकरेंनी सदस्यांची मते जाणून घेत लगेचच राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व इतरही मंत्रीमंडळासोबत चर्चा केली आहे. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सविस्तर वाचा...
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा...