- पालघर/वसई - नालासोपारमध्ये रेल्वेखाली येऊन एकाच घरातील 3 जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाला असून 10 वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे.
सविस्तर वाचा- ह्रदयद्रावक ! रेल्वेखाली एकाच घरातील 3 जणांनी घेतली उडी; दोघांचा मृत्यू, एक बचावली
- मुंबई - महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून ही आघाडी पूर्णत्वास आली होती. त्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहेल होते. त्यावर प्रतिक्रिया देतान खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी यांच्या मुद्यांचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी सूचित केलेल्या मुद्यांनुसार कामही केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सविस्तर वाचा- महाविकास आघाडीत सोनियांचेही योगदान महत्त्वाचे; त्यांच्या सुचनेवर काम केले जाईल
- मुंबई - 'शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. रावले यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी आज संध्याकाळी मुंबईत आणले जाणार आहे. दादर मधील त्यांच्या घरी पार्थिव आणल्यानंतर परळच्या शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतीम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सविस्तर वाचा- कट्टर शिवसैनिक आणि माजी खासदार मोहन रावले यांचे निधन
- कोलकाता - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसासाठी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले आहेत. कोलाकातामध्ये दाखल होताच शाह यांनी कोलकातामधील रामकृष्ण मिशन आश्रमात उपस्थिती लावून स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सविस्तर वाचा- गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर; तृणमूलचे फुटीर आमदार करणार भाजप प्रवेश?
- अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. आताही ते सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या एका हटके घोषणेमुळे चर्चेत आले आहेत. पारनेर मतदारसंघातील जी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करेल, अशा ग्रामपंचायतीला आमदार लंके आपल्या आमदार निधीतून पंचवीस लाखांची मदत करणार आहेत. यासाठी त्यांनी सध्या मतदारसंघातील गट निहाय गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
सविस्तर वाचा- ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् आमदार निधीचे पंचवीस लाख मिळवा..!!
- अमरावती- गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाची काळी किनार लागलेल्या मेळघाटात आजही कुपोशित बालके आढळतात. शासन कितीही गाजावाजा करत असले तरी अनेक आदिवासी मुलापर्यंत कुपोषणासंबिधित योजना पोहचत नसल्याने अनेक लहान मुले आजही कुपोषमग्रस्त आहेत. तर दुसरीकडे अमरावती शहरात मात्र फास्ट फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी १ ते ५ या वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणा मोठया प्रमाणात आढळून येत आहे. एकीकडे बालकांमध्ये वाढते कुपोषण आणि दुसरीकडे वाढत्या लठ्ठपणावर आळा घालण्याचे प्रशासनामोर आवाहन आहे.
सविस्तर वाचा- मेळघाट; पोषक आहाराच्या कमतरतेमुळे वाढतोय कुपोषणाचा स्तर; तर दुसरीकडे फास्ट फूडमुळे बालकांच्या लठ्ठपणात वाढ....
- मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसप्रणित महाआघाडीचे सरकार मागील वर्षभरापासून राज्यात सत्तेवर आहे. तीन भिन्न पक्षांचे सरकार असल्याने हे सरकार कोसळेल, फार काळ टिकणार नाही, असे कयास विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून नेहमीच केला जात आहे. यात काँग्रेसच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे भर पडत आहे. मात्र आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे तीनही पक्ष सांगत आहेत. आता काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांची बैठक गांधींनी बोलावली आहे.
सविस्तर वाचा- महाविकास आघाडी सरकारमध्ये नेमकी काय आहे काँग्रेसची भूमिका?
- अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे नेहमीच चर्चेत असलेले व्यक्तिमत्व आहे. आताही ते सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या एका हटके घोषणेमुळे चर्चेत आले आहेत. पारनेर मतदारसंघातील जी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करेल, अशा ग्रामपंचायतीला आमदार लंके आपल्या आमदार निधीतून पंचवीस लाखांची मदत करणार आहेत. यासाठी त्यांनी सध्या मतदारसंघातील गट निहाय गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
सविस्तर वाचा- ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् आमदार निधीचे पंचवीस लाख मिळवा..!!
- हैदराबाद - 'पंतप्रधान पीक विमा योजना' (पीएमएफबीवाय) ही फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू करण्यात आली. ही जगातली सर्वात मोठी पीक विमा योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील शेतकऱ्यांना उत्पादनाच्या असुरक्षिततेपासून संरक्षण देणे आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात अनुदानीत आहे आणि यात शेतकऱ्यांकडून कमी हप्ता (प्रीमियम) आकारला जातो. या उपक्रमांतर्गत शेतकरी खरीप पेरणीदरम्यान जास्तीत जास्त २ टक्के आणि अन्न व तेलबिया पिकांसाठी रब्बी पेरणीच्या वेळी फक्त १.५ टक्के हप्ता देतात. वार्षिक नगदी पिकांसाठी त्यांना जास्तीत जास्त ५ टक्के हप्ता भरणे आवश्यक आहे.
सविस्तर वाचा- पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनुकूल करणे : मूल्यांकन पीएमएफबीवायचे
- अॅडलेड - वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघ दुसऱ्या डावात पूर्णपणे ढेपाळला. अवघ्या ३६ धावात टीम इंडियाचे ९ फलंदाज बाद झाले. तर, मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर गेला. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार विराट कोहली ४ धावांवर बाद झाला. तर, अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतले. बुमराह, पुजारा, कोहली, अशा आघाडीच्या फलंदाजांना कमिन्सने तर, रहाणे, विराही, साहा या मधल्या फळीला हेझलवुडने गारद केले. पॅट कमिन्सने २१ धावांत ३ तर, जोश हेझलवुडने अवघ्या ८ धावा देत ५ बळी टिपले. 'पिंक बॉल' कसोटीत विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ९० धावांची आवश्यकता आहे.
सविस्तर वाचा- अवघ्या ३६ धावांवर 'ऑल आऊट'!..ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांची गरज