- मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. मात्र यासाठी 8 जानेवारीपूर्वी तिला पोलीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेशपत्र जारी केले आहे.
सविस्तर वाचा- कंगनाला अटकेपासून संरक्षण , 8 जानेवारीपर्यंत पोलीस चौकशीला हजर राहावे लागणार
- मुंबई - सत्तेचा उपयोग लोकांच्या कामासाठी करायचा असतो. मात्र, केंद्रातील सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. केंद्रातील भाजप सरकार सत्तेचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
सविस्तर वाचा- विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग - शरद पवार
- दौंड - शिरूर आणि दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. दौंड तालुक्यातील नानगाव येथील मकबूल हसन मुलाणी (वय ३३) या तरुणावर (ता.२३) रोजी रात्री एकच्या सुमारास कामावरुन घरी येत असताना नानगांव व वडगांव रासाई येथील पुलाच्या जवळील चौकात बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे पारगाव परिसरात पिंजरा लावून बिबट्या पकडण्यात यावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा- व्यक्तीवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; नानगाव येथील घटना
- मुंबई - कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लसीकरण आणि तिचे वितरण याबाबत राज्यात एका कृती दलाची स्थापना केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सविस्तर वाचा- कोरोना लसीकरणाबाबत राज्यात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री
- मुंबई - भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्तिथीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रभागी असताना आता मराठवाड्यातील मोठे नेते राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीची मराठवाड्यातील ताकद वाढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून जयसिंगराव यांना उमेदवारी देण्यात येईल असे चर्चिले जात आहे.
सविस्तर वाचा- मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार, एका खासदारकीची लागणार लॉटरी?
- नागपूर - प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना नागपुरातून समोर आली आहे. प्रेयसीला महागडे गिफ्ट देण्यासाठी तरुण चक्क दुचाकी चोर बनला आहे. सचिन अतकरी असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. दरम्यान सचिन अतकरीकडून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याने आतापर्यंत किती वाहने चोरली, ती कुठे विकली याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
सविस्तर वाचा- प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी तरुण बनला दुचाकी चोर
- मुंबई - भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्तिथीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अग्रभागी असताना आता मराठवाड्यातील मोठे नेते राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादीची मराठवाड्यातील ताकद वाढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून जयसिंगराव यांना उमेदवारी देण्यात येईल असे चर्चिले जात आहे.
सविस्तर वाचा- मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद वाढणार, एका खासदारकीची लागणार लॉटरी?
- मीरा भाईंदर (ठाणे) - महानगरपालिका हद्दीत गेल्या अनेक दिवसात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत घट झाली. त्यामुळे पालिकेतील आरोग्य विभाग सुस्त झाल्याचे दिसून आले आहे. आज प्रभाग समिती २ मध्ये मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात मीरा भाईंदर शहरात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट झाली असली तरीही दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारू शकत नाही.
सविस्तर वाचा- पालिका प्रशासनाला उशिरा शहाणपण; मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात
- अमरावती - महाविद्यालयातील प्राध्यापिकेचा विनयभंग करून मानसिक छळ करणाऱ्या प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मूर्तिजापूर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य डॉ. संतोष ठाकरे यांच्यावर मूर्तिजापूर पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा- अमरावती : प्राध्यापिकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल
- नवी दिल्ली- केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या ४३ मोबाईल अॅपवर बंदी लागू केली आहे. यामध्ये बहुतांश अली एक्सप्रेस, मँगो टिव्ही असे चिनी अॅप आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा ६९ए कायद्यान्वये सरकारने अॅपवर बंदी लागू केली आहे.
सविस्तर वाचा- देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या ४३ चिनी अॅपवर केंद्र सरकारकडून बंदी