अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीची नोटीस, आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडून गेल्या तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या असून अनिल देशमुख यांच्या 27 कंपन्यांमध्ये व्यवहार झाला असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. यासंदर्भात ईडीने आज अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले आहेत.
कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील ५९ डेपो बंद!
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील काही आगारात कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयानेही संप मागे घेण्याचे आदेश दिले. मात्र, कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत, संप सुरूच ठेवला आहे. राज्यातील ५९ आगार या संपामुळे बंद पडले असून, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या बेनामी 27 कंपन्यांचा ईडीकडून तपास सुरू
शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी ईडीने अटक केलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या विविध २७ कंपन्या असून वसुलीतील रक्कम हवालामार्फत त्यात वळविल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. यातील बहुतांश कंपन्याचा वापर काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा केल्याचे गृहीत धरून तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबतची घोषणा केली आहे.४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावत आहे, बहुतांश भागात AQI पातळी अत्यंत खराब आहे
दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे समोर आले आहे, दरम्यान, बहुतांश भागात AQI पातळी अत्यंत खराब असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीर लोकांनी काळजी घ्यावी अशी विनंती हवामान तज्ञ करत आहेत.
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सुब्रत मुखर्जी यांचे निधन झाल्याची बातम समोर आली आहे. ही घटना (दि. ४ नोव्हेंबर)रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास कोलकत्ता घडली. ते 75 वर्षांचे होते. सुब्रत मुखर्जी यांच्यावर सरकारी एसएसकेएम (sskm) या रूग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले.