आयकर विभागाची अजित पवारांना नोटीस नाही, वकिलांचे स्पष्टीकरण
अजित पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवली असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर या वृत्ताचे अजित पवार यांच्याकडून खंडन करण्यात आल आहे. अजित पवार यांचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी आयकर विभागाकडून आलेल्या नोटीचीचे खंडन केले आहे.
जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे निधन
जेष्ठ शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांचे आज मंगळवार (दि. ३)रोजी येथील जयसिंगपूरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. जाधव यांनी सुमारे ५० वर्ष महाराष्ट्रात फिरून शस्त्रांचा मोठा साठा निर्माण केला होता. यामध्ये शस्त्रास्त्रे आणि प्रात्यक्षिके हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता.
पाकिस्तानची विजयी घोडदौड कायम! नामिबियाला नमवून सेमीफायनलमध्ये धडक
टी-२० विश्वकरडंक स्पर्धेत मोठ्या फॉर्मात खेळणाऱ्या पाकिस्तानने चौथ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बाबरसेनेने नवख्या नामिबियाला ४५ धावांनी गारद केले. अबुधाबीच्या शेख झायेद मैदानावर पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगालचे माजी मंत्री रवी रंजन चट्टोपाध्याय यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले
पश्चिम बंगालचे माजी मंत्री रवी रंजन चट्टोपाध्याय यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार आहेत.
पंतप्रधान मोदी आज कमी लसीकरण कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांची आढावा बैठक घेणार असून यामध्ये ते त्या त्या जिल्ह्यांची परिस्थिती जाणून घेणार आहेत.
इटली आणि ब्रिटनचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना झाले आहेत.
इटली आणि ब्रिटनचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी भारताकडे रवाना झाले आहेत. ते आज भारतात परततील.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अखेर ईडीकडून अटक, आज न्यायालयात हजर करणार
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल सोमवार(दि. १ नोव्हेंबर)रोजी सकाळी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांची सुमारे १४ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना अखेर मंगळवार (दि. २ नोव्हेंबर) रोजी रात्री उशिरा आटक करण्यात आली.
टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत इंग्लंडची विजयासह सेमी फायनलमध्ये एन्ट्री,बटलरचं झंझावती शतक
इंग्लंड क्रिकेट संघाने टी-२० विश्वकरंडकस्पर्धेत सलग चौथा विजय मिळवला आहे. यष्टीरक्षक जोस बटलरने दमदार शतक ठोकलं. दरम्यान, त्याचवेळी इंग्लंडचा विजय पक्का झाला होता. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंका संघाला 26 धावांनी मात देत विजय मिळवला. ग्रुपमध्ये सर्वाधिक विजय मिळवत सेमीफायनलमध्येही एन्ट्री श्रीलंका संघाने निश्चित केली आहे. प्रथम फलंदाजी करत बटलरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर इंग्लंडने 163 धावा केल्या.
२ नोव्हेंबर पत्रकार हल्ला विरोधी दिन
२ नोव्हेंबर पत्रकार हल्ला विरोधी दिन आहे. जगभर मोठ्या प्रमाणात पत्रकारांवर हल्ले होत आहेत. तसेच, लोकशाहीने माध्यमांना दिलेले स्वतंत्र्याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात गैरवापरही होताना दिसत आहे. अशा काळात पत्रकार हल्ला विरोधी दिन साजरा होत आहे.
नीटमध्ये मुंबईतील कार्तिका नायर देशात पहिली
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यामध्ये हैदराबाद येथील मृणाल कुट्टेरी, दिल्ली येथील तन्मय गुप्ता आणि मुंबईची कार्तिका नायर यांनी पैकीच्या पैकी (७२०) गुण मिळवले आहेत. त्यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
बंदर उभारणीसाठी खारफुटींची कत्तल
उरणनजीकच्या करंजा खोपटा खाडीनजीक उभारण्यात येत असलेल्या खासगी बंदरासाठी संबंधित कंपनीने किनाऱ्यावरील खारफुटींची शंभरहून अधिक झाडांची कत्तल केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या कृत्याचा सुगावा लागू नये म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका बोटीतून ही तोडलेली खारफुटी खोल समुद्रात फेकली आहेत.
राज्यात दीड वर्षांत सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या रविवारी कमी असल्यानेच रुग्णसंख्याही कमी होती. दिवसभरात ८०९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, मे २०२० नंतर दिवसभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
देशातील 3 लोकसभा जागेंचा आणि 30 विधानसभा जागेंचा आज निकाल
आज देशातील ३ लोकसभेसह ३० विधान सभेच्या जागेंसाठी मतमोजणी होत आहे. यामध्ये ३० विधानसभा जागांमध्ये १४ राज्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५ जागा आसामच्या, ४ पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी ३, बिहार, कर्नाटक, राजस्थानमधील प्रत्येकी २ आणि महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाणा हरियाणा, मिझोराम, नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.