मुंबई- राज्यात कोरोना संकटाची स्थिती भीतीदायक झाली आहे. राज्यात एकाच दिवशी 773 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, राज्यात 66 हजार 836 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकाच दिवसात 74 हजार 45 रुग्णांनी कोरोनवर मात केली आहे. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर रुग्ण एकाच दिवसात बरे झाले, ही समाधानाची बाब आहे. असे असले तरी राज्यात औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा ही चिंतेची बाब बनली आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. काल लसीचा साठा कमी असल्याने 52 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आज ज्यांचा दुसरा डोस आहे, अशा लोकांनाच शिल्लक लसीच्या साठ्यामधून लस द्यावी, असे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. सविस्तर वाचा..
मुंबई - नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायरबरोबरच ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. तसेच, ऑक्सिजन टँकरला रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे, पोलीस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टँकरला वळवू नये, अशा सूचनाही दिल्या. सविस्तर वाचा..
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. या आदेशानुसार, नव्याने वितरित होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पुढील आदेश येईपर्यंत आरटीओंमध्ये अभ्यांगतांना प्रवेश मिळणार नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले. सविस्तर वाचा..
पुणे - लष्कराच्या एएफएमसीतील ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी 18 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर स्वतःला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिसांनी लष्करातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी अनंत नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. सविस्तर वाचा..
हैदराबाद - अत्यावश्यक सेवेचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आरोग्य सेवा आवश्यक आहे. तसेच, रुग्णांची योग्य देखभाल करण्यासाठी सामान्य आणि आपात्कालीन घरगुती व उपचारित पाण्याची व्यवस्था, उर्जा यंत्रे, वैद्यकीय गॅस आणि व्हॅक्यूम सिस्टम, नैसर्गिक वायू प्रणाली, हिटींग, व्हेंटिलेशन आणि वातानुकूलित प्रणाली, लिफ्ट/लिफ्ट, आग/जीवन सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. सविस्तर वाचा..
गुवाहाटी- देशात ऑक्सिजनचा पुरवठा व निर्मिती कमी होत असताना संरक्षण दलही सक्रिय झाले आहे. संरक्षण विभागाच्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) विभागाने ऑक्सिजन निर्मितीकरता लागणारे प्लांट आणि कंटेनर जर्मनीहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने हा निर्णय एएफएमएसने घेतला आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - विशाखापट्टणमहून या काळात लोकांना जीवनदान देणारी ऑक्सिजन एक्स्प्रेस काल रात्री 8 वाजून 10 मिनिटाने नागपूरच्या मुख्य रेल्वे स्थानकावर पोहचली. या एक्स्प्रेसमध्ये असलेल्या ७ टँकर्सपैकी 3 टँकर नागपुरात उतरविण्यात आले. विशाखापट्टणमहून निघालेली ही एक्स्प्रेस महाराष्ट्रात काल दाखल झाली. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. परिणामी, तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात अडचणीत वाढ झाली आहे. यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस जीवनवाहिनी ठरणार आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचवण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लँटच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत कोविड विरोधातील लढाई जिंकू, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोविडसंदर्भात काल आयोजित बैठकीत ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग झालेल्या इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. सविस्तर वाचा..
मुंबई - संपूर्ण देश मागील वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाशी लढत असून दुसरी लाट तर देशात हाहाकार माजवत आहे. अशात भारतीयांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली आहे. झायडस कॅडीला कंपनीने 'विराफीन' औषध कोरोनावर गुणकारी ठरत असल्याचा दावा केला आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून याचा एक डोस द्यावा लागत असून यामुळे रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. सविस्तर वाचा..