ETV Bharat / bharat

मायदेशी परतले टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडू, दिल्लीतील हॉटेलमध्ये सन्मान सोहळा आयोजित

author img

By

Published : Aug 9, 2021, 6:42 PM IST

Updated : Aug 9, 2021, 10:26 PM IST

टोक्यो ओलंपिक में अपने शानदार प्रदर्शन के बाद अब भारतीय खिलाड़ी स्वदेश लौट रहे हैं. आज अशोका होटल के अंदर केंद्रीय खेल मंत्री अनुराग ठाकुर हॉकी के अंदर शानदार प्रदर्शन करने वाले भारतीय पुरुष हॉकी टीम और महिला टीम को सम्मानित करेंगे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

21:34 August 09

महिला हॉकी संघाने देशवासीयांची मने जिंकली - केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू

नवी दिल्ली - महिला हॉकी संघाला पदक मिळाले नाही, पण त्यांनी देशवासीयांची मने जिंकली. पंतप्रधान मोदी संघाशी बोलताचा व्हिडिओ पाहून लोक रडले. तो खूप भावनिक क्षण होता. सात पदके भारत देशासाठी आणून इतिहास रचला, असे भावोद्गार केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू काढले.

20:47 August 09

नीरजजी आपण पंतप्रधानांसोबत पाणीपूरी खाऊ - केंद्रीय क्रीडा मंत्री

नवी दिल्ली - खेळाडूंना आपल्या सरावासाठी व उत्तम आरोग्यासाठी विविध डायट करावे लागले. त्यामध्ये चटपटीत पदार्थ असो किंवा आईस्क्रीम, अशा पदार्थापासून त्यांना दूर रहावे लागते. म्हणून केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, नीरजजी तुम्ही खूप दिवसांपासून चुर्मा व गोलगप्पे (पाणीपूरी) खाल्ले नाही तसेच पी.व्ही.सिंधुनेही आईस्क्रीम खाल्ली नाही, आपण लवकरच हे सर्व पदार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खाऊ.

20:33 August 09

मंत्री महयोदयांनी केले सुवर्ण पदकवीर नीरज चोप्राचे सत्कार

    नवी दिल्ली - केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री क्रीडा निसीथ प्रामाणिक आणि कायदा मंत्री तथा माजी क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी सुवर्ण पदकवीर नीरज चोप्राचे सत्कार केले.

    20:29 August 09

    ऑलिम्पिकमधील सर्व भारतीय खेळाडू नव्या भारताचे नवे हिरो - केंद्रीय क्रीडा मंत्री

    नवी दिल्ली - ऑलिम्पिकमधील सर्व खेळाडू भारतीय खेळाडू नव्या भारताचे प्रतिनिधित्व करतात. ते नव्या भारताचे, नवे हिरो आहेत, अशा शब्दात केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. तसेच ते म्हणाले, आम्ही यापुढेही विविध क्रीडा प्रकारात उत्तमोत्तम सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

    20:27 August 09

    भारतासाठी सुवर्णपदक जिंकूण छान वाटते - नीरज चोप्रा

    नवी दिल्ली - भारतासाठी सुवर्णपदक जिंकूण खूप छान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्राने दिली.

    19:29 August 09

    पुरुष हॉकी संघाने केक कापत केला जल्लोष

    नवी दिल्ली - तब्बल 41 वर्षानंतर कांस्य पदक आपल्या नावे केले आहे. यापूर्वी  1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळवले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक 2020, मध्ये उत्तम प्रदर्शन करत कांस्य पदक आपल्या खिशात घातले. दिल्लीतील हॉटेल अशोका येथे आल्यानंतर संघाने केक कापत जल्लोष केला आहे.

    19:08 August 09

    महिला हॉकी संघाने केक कापत केला जल्लोष

    नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाने दिल्लीतील हॉटेल अशोका येथे पोहोचल्यानंतर केक कापत जल्लोष साजरा केला. तद्पूर्वी त्यांनी राष्ट्रगीत गायले.

    19:04 August 09

    पॅरिस ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळविण्यासाठी घेणार परिश्रम - बॉक्सर लवलिना बोर्गोहेन

    बॉक्सर लवलिना बोर्गोहेन
    बॉक्सर लवलिना बोर्गोहेन

    नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतात परतल्यानंतर लवलिना म्हणाले, आता आगामी पॅरिस, 2024 ऑलिम्पिकसाठी नव्याने सुरुवात करणार आहे व सुवर्ण पदक मिळविण्यासाठी भरपूर परिश्रम घेणार आहे.

    18:55 August 09

    भारतीय महिला हॉकी संघ हॉटेल अशोका येथे दाखल

    नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघ हॉटेल अशोक येथे झाले आहे.

    18:44 August 09

    हे आहेत ऑलिम्पिकमधील पदकवीर

    • नीरज चोप्रा - सुवर्ण (भालाफेक)
    • रवि दहिया - रौप्य (कुस्ती)
    • मीराबाई चानू - रौप्य (वेटलिफ्टिंग)
    • पी.व्ही. सिंधू - कांस्य (बैडमिंटन)
    • लवलीना बोरगोहेन - कांस्य (बॉक्सिंग/मुष्ठियुद्ध)
    • बजरंग पूनिया- कांस्य (कुस्ती)
    • पुरुष हॉकी संघ- (कांस्य)

    18:22 August 09

    मायदेशी परतले टोकियो ऑलिम्पिकमधील खेळाडू, दिल्लीतील हॉटेलमध्ये सन्मान सोहळा आयोजित

    हॉटेल अशोका बाहेरुन संवाद साधताना प्रतिनिधी

    नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत भारतीय खेळाडू आज (दि. 9 ऑगस्ट) मायदेशी परतले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य पदक मिळवले आहेत.

    भाला फेक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले तर पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर कांस्य पदक आपल्या खिशात घातले. भारतीय राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये मागील 41 वर्षांपासून ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक मिळाले नव्हते. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने यापूर्वी 1980 साली मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतर तब्बल 41 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक आपल्या नावे केले.

    भारतीय पुरुष हॉकी संघाप्रमाणे भारतीय महिला हॉकी संघानेही उत्तम प्रदर्शन केले. मात्र, भारतीय महिला संघ यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणतेही पदक प्राप्त केले नाही. महिला हॉकी संघाने अपल्या प्रदर्शनातून पुढील ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

    टोकियो ऑलिम्पिकमध्ये अपल्या उत्तम प्रदर्शनानंतर भारतीय खिळाडू मायदेशी परतले आहेत. आज अशोका हॉटेलमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर हे हॉकी संघात उत्तम प्रदर्शन करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघ व महिला संघाला सन्मानित करणार आहेत.

      Last Updated : Aug 9, 2021, 10:26 PM IST
      ETV Bharat Logo

      Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.