औरंगाबाद - नातेवाईकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्यावर पासपोर्ट हरविल्यामुळे तुरुंगवासात गेलेल्या एक 65 वर्षीय आजी तब्बल 18 वर्षांनंतर मायभूमीत परतल्या आहेत. हसीना दिलशाद अहमद असे या आजींचे नाव असून औरंगाबादमध्ये त्या दाखल झाल्या आहेत. देशात परतल्यानंतर अतिशय समाधान वाटत असल्याचे या आजींनी म्हटले आहे.
हैदराबाद - तेलंगाणा राज्यात अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे. बायको पळून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या मनात महिलांबद्दल राग उत्पन्न झाला होता. या रागातून त्याने तब्बल १८ महिलांची हत्या केली. माईना रामूलू असे या सिरियल किलरचे नाव असून त्याच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. हैदराबाद पोलिसांनी या मोस्ट वॉन्टेंड किलरच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नवी दिल्ली - ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ल्यावर कब्जा मिळवून झेंडा फडकावल्याच्या घटनेला केंद्रीय गृह मंत्रालयाने गांभीर्याने घेतले आहे. दिल्लीमधील विविध भागांत शेतकऱ्यांनी पोलिसांवर हल्ले केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी निवासस्थानी बैठक घेतली.
पलवल - राजधानी दिल्लीत ज्या प्रमाणे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती तशी रॅली हरयाणातील पलवल येथही काढण्यात आली होती. रॅलीदरम्यान पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाल्यांतर आज पोलिसांनी सुमारे १ हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केली नाही.
- वाचा सविस्तर -हरयाणात एक हजार अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
न्युयॉर्क - राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू आहे. काल प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. दरम्यान, पंजाब हरयाणा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद जगात दिसून येत आहेत. अमेरिकेतील न्युयॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी शहरात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला होता.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा घेतला होता, सोबतच अनेक ठिकाणी सुरक्षा कवच तोडग मालमत्तेचे उल्लंघन केले तसेच पोलिसांवर हल्ला केला. या प्रकरणी आता दिल्ली पोलिासांनी २२ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे.
वाचा सविस्तर-ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर २२ गुन्हे दाखल, लाल किल्ल्याबाहेर कडेकोट सुरक्षा
मुंबई - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये रेल्वेने लोकलसेवा बंद केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून लोकल सेवा हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. अशातच मध्य रेल्वेच्या मार्गावर रुळ दुरुस्ती करणारे मशीन घसरून दुर्घटना घडली आहे. यामुळे या मार्गावरील अंबरनाथ ते बेदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारी विद्यार्थ्यांच्या हसण्या-बागडण्याने फुलल्या. कोरोनाचे संकट अजून संपले नसल्याने योग्य ती खबरदारी घेत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही मोठा उत्साह बघायला मिळत आहे.
मुंबई- आत्मनिर्भरतेचा नारा देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भविष्यात सर्व मेट्रो देशातच तयार करून घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशात तयार झालेली पहिली विनावाहक मेट्रोची देशात निर्मिती झाली आहे. ही मेट्रो आज (बुधवारी) मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असलेल्या चिकू पठाण याला एनसीबीने अटक केली. त्यानंतर यासंदर्भात फरार असलेल्या आरिफ भुजवाला याला रायगड पोलिसांच्या मदतीने रायगड जिल्ह्यातून एनसीबीच्या पथकाने अटक केलेली आहे. आरीफच्या चौकशीत कैलास राजपूत हा आता रडारवर आला आहे.